भारतीय महिला संघाचा या वर्षातील वेळापत्रक बऱ्यापैकी आता व्यस्त असल्याचे दिसत आहे. पुढील महिन्यात भारतीय महिला संघ इंग्लंड दौरा करणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया दौरा करायचा असल्याचेही समजत आहे. विशेष म्हणजे भारतीय महिला संघ अगामी इंग्लंड दौऱ्यात तब्बल ६ वर्षांनंतर कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. तसेच आता असेही वृत्त येत आहे की या वर्षी भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील एक कसोटी सामना खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय महिला संघाने अखेरचा कसोटी सामना १५ वर्षांपूर्वी म्हणजेच २००६ साली खेळला आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियामध्ये एक कसोटी सामना खेळणार असून अजून तरी याबद्दल अधिकृत माहिती बीसीसीआय किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेली नाही.
भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियामध्ये अखेरचा सामना ऍडलेड येथे खेळला होता. आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आत्तापर्यंत ९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. या ९ पैकी एकाही सामन्यात भारतीय महिला संघाला विजय मिळवता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाने यातील ४ सामने जिंकले आहेत. तर ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
या दोन संघात सर्वात पहिला कसोटी सामना १९७७ साली खेळवण्यात आला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्यानंतर १९८४ साली भारतात ४ कसोटी सामने झाले होते. हे चारही सामना अनिर्णित राहिले तर १९९०-९१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ कसोटी सामने झाले होते. त्यातील एक सामना अनिर्णित राहिला तर अन्य २ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. २००६ साली झालेला अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.
मेगन शटने दिले संकेत
खरंतर भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल बीसीसीआय किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शटने ‘नो बॉल्स: द क्रिकेट’ या पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले होते की ऑस्ट्रेलियाला सप्टेंबरच्या मध्यंतरी भारताविरुद्ध खेळायचे आहे.
खरंतर भारतीय महिला संघ यावर्षीच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होता. पण डिसेंबर २०२० मध्ये हा दौरा पुढे ढकलण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
महत्त्वाची बातमी! यूके आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंना मिळणार लसीचा दुसरा डोस
ऑलिम्पिक पदक विजेता सुशीलकुमार अडचणीत, जामीन अर्ज फेटाळल्याने कुठल्याही क्षणी होणार अटक
मोठी बातमी! ‘मिस्टर ३६०’ पुन्हा दिसणार नाही दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीत; बोर्डाने केले स्पष्ट