क्रिकेटमध्ये साधारपणे दिसणारी एक बाब आहे. ती म्हणजे, जर एखादा संघ फलंदाजी आणि गोलंदाजीने विरोधी संघाला मात देण्यात कमी पडतो; तर मग शाब्दिक चालाकीने त्या विरोधी संघातील खेळाडूंची एकाग्रता भंग करून त्यांना पिछाडीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यालाच आपण क्रिकेटच्या भाषेत ‘स्लेजिंग’ असेही म्हणतो. यामध्ये महिला संघसुद्धा काही मागे नाहीत. नुकत्याच झालेल्या इंगलंड महिला विरुद्ध भारतीय महिलांच्या एकमेव कसोटी सामन्यात सुद्धा स्लेजिंगचा प्रकार पाहण्यास मिळाला. याबाबत नवोदित भारतीय खेळाडू स्नेह राणा हिने माहिती दिली आहे.
तब्बल ७ वर्षांनंतर भारतीय महिला संघ कसोटी क्रिकेट खेळला. इंग्लंड महिला संघांनी उभारलेल्या ३९६ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने सुंदर अशी शतकीय सलामी दिली. भारतीय महिलांकडून आपला पहिला कसोटी सामना खेळणारी शेफालीने ९६ धावांची खेळी केली आणि तिला स्म्रिती मंधानाची चांगली साथ मिळाली. नंतर भारतीय महिला संघाची फलंदाजी अक्षरश: गडगडली आणि भारतीय महिला संघाला फॉलोऑनचा सामना करावा लागला.
दुसऱ्या डावात इंग्लंडच्या महिला भारतीय महिलांची एकाग्रता भंग करण्यासाठी सतत स्लेजिंग करत होत्या. परंतु भारतीय महिला संघाने शांत राहून आपल्या खेळावर लक्ष दिले आणि एकमात्र कसोटी सामना अनिर्णीत ठेवण्यात यशस्वी झाल्या. कारकीर्दीचा पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या स्नेह राणाला इंग्लंड महिला संघाने खूप स्लेज करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती डावाखेर बाद झाली नाही.
तानिया भाटियासोबत नाबाद शतकीय भागीदारी रचणारी स्नेह राणाने पत्रकार परिषद सांगितले की, “आम्हाला त्रास देणे हे त्यांचे कामच होते. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. परंतु, आम्ही त्याचाकडे लक्ष्य दिले नाही. आम्ही फलंदाजी करताना एकमेकींसोबत सतत बोलत राहिलो. त्यामुळे आमची एकाग्रता टिकून राहिली. संघासाठी आम्हाला खेळपट्टीवर टिकून राहणे गरजेचे होते आणि ते आम्ही केले.”
स्नेह राणाचा हा पहिला सामना होता. या अष्टपैलू खेळाडूने ३९.२ षटके गोलंदाजी करून सुद्धा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येवून नाबाद ८० धावा केल्या. तिने सांगितले की, “यावेळी आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता. आम्ही आमच्या खेळावर लक्ष्य ठेऊन होतो. ते स्लेजिंग करत होते. तरीही आम्ही आमची फलंदाजी चालूच ठेवली. मी स्वत:ला व्यस्त ठेवले आणि माझ्यावर दबाव न यावा यासाठी मी माझी नैसर्गिक खेळ खेळला.”
महत्त्वाच्या बातम्या-
चित्याहूनही जास्त चपळ! हवेत उडी मारत अगदी क्षणभरात कोहलीने पकडला एकहाती कॅच
अवघ्या २२ धावांवर अष्टपैलू अश्विन तंबूत, पत्नीने चकित होत दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
ऐतिहासिक सामन्यात फ्लॉप ठरलेल्या पुजाराला अनुभवी गोलंदाजाचा सल्ला, करायला सांगितले ‘हे’ काम