तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या महिला संघाने टीम इंडियाचा 9 गडी राखून पराभव केला. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला होता. मात्र वेस्ट इंडिजने पलटवार करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. आता या मालिकेतील तिसरा टी20 सामना फायनल म्हणून खेळला जाईल. 180.85 च्या स्ट्राइक रेटने 85* धावांची इनिंग खेळून वेस्ट इंडिजला दुसरा सामना जिंकण्यात मदत करण्यात कर्णधार हीली मॅथ्यूजने सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने अवघ्या 15.4 षटकांत विजय मिळवला. या दरम्यान संघाने केवळ एक विकेट गमावली.
West Indies win the 2nd T20I and level the series 1⃣-1⃣
Scorecard ▶️ https://t.co/msHanvwQsI#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/41XLmKDvnI
— BCCI Women (@BCCIWomen) December 17, 2024
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो त्यांच्यासाठी अगदी योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकात 159/9 धावा केल्या. कर्णधार स्मृती मानधनाने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 41 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. याशिवाय रिचा घोषने 17 चेंडूत 6 षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजच्या चार गोलंदाजांनी 2-2 बळी घेतले. टीम इंडियाने रनआउटमध्ये एक विकेट गमावली.
लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार हिली मॅथ्यूज आणि कियाना जोसेफ यांनी वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 66 (40 चेंडू) धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजला पहिला धक्का 7व्या षटकात कियाना जोसेफच्या रुपाने बसला. कियाना जोसेफने 22 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. त्यानंतर शमायन कॅम्पबेलने हिली मॅथ्यूजसह दुसऱ्या विकेटसाठी 94* (55 चेंडू) धावांची अखंड भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान कर्णधार हीली मॅथ्यूजने 47 चेंडूंत 17 चौकारांच्या मदतीने 85* धावा केल्या तर शमाईन कॅम्पबेलने 26 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 29* धावा केल्या.
हेही वाचा-
मुंबईमध्ये येताच या खेळाडूचे नशीब उजळले, किवीसंघाचे कर्णधारपद मिळाले
IND vs AUS; गाबा कसोटीत शानदार खेळी केल्यानंतर, केएल राहुल म्हणाला…
IND vs AUS; मोहम्मद सिराजवर भडकले सुनील गावसकर? नेमकं कारण काय?