भारतीय संघाने महिला आशिया चषक 2022मधील 15व्या सामन्यात विजय मिळवला. शनिवारी (दि. 8 ऑक्टोबर) सिल्हेट क्रिकेट मैदानावर भारत आणि बांगलादेश संघात हा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेश महिला संघाला नमवत 59 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा स्पर्धेतील चौथा विजय होता. भारताच्या विजयाची शिल्पकार शेफाली वर्मा ठरली. या विजयामुळे भारतीय संघाचं गुणतालिकेतील स्थान आणखी मजबूत झालं आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 159 धावा चोपल्या. तसेच, बांगलादेश संघाला 160 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला 7 विकेट्स गमावत 100 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 59 धावांनी जिंकला.
A clinical bowling performance from #TeamIndia as we beat Bangladesh by 5⃣9⃣ runs. ????????
Scorecard ➡️ https://t.co/YrBDw2RKTJ#INDvBAN | #AsiaCup2022 pic.twitter.com/uF7n1eiYFX
— BCCI Women (@BCCIWomen) October 8, 2022
बांगलादेश संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार निगार सुलताना (Nigar Sultana) हिने सर्वाधिक धावा केल्या. यावेळी तिने 29 चेंडूत 36 धावांची खेळी केली. या धावा करताना तिने 5 चौकारही मारले. तिच्याव्यतिरिक्त फरगाना होक (30) आणि मुर्शिदा खातून (21) यांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली. याव्यतिरिक्त एकही फलंदाज 10 धावांची आकडा पार करू शकली नाही.
यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दिप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर करण्यात यश आले.
तत्पूर्वी भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामी फलंदाज शेफाली वर्मा (Shafali Verma) चांगलीच चमकली. तिने धडाकेबाज फलंदाजी करत 44 चेंडूत 55 धावा चोपल्या. या धावा करताना शेफालीने 2 षटकार आणि 5 चौकारही मारले आहेत. शेफालीव्यतिरिक्त स्म्रीती मंधाना हिने 38 चेंडूत 47 धावा केल्या. यावेळी तिने 6 चौकार मारले होते. तसेच, जेमिमाह रोड्रिग्ज हिने 35 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, दिप्ती शर्माला फक्त 10 धावा करता आल्या. रिचा घोष (4), पूजा वस्त्राकार (1) आणि किरण नवगिरे (0) यांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.
5⃣0⃣ for Shafali Verma ????????
A superb batting display by the #TeamIndia batter as we move to 108/1 after 14 overs. ????
Follow the match ➡️ https://t.co/YrBDw2RKTJ#INDvBAN #AsiaCup2022 pic.twitter.com/8ZI6id4Jkq
— BCCI Women (@BCCIWomen) October 8, 2022
यावेळी गोलंदाजी करताना बांगलादेश संंघाकडून रुमाना अहमद हिला सर्वाधिक विकेट्स मिळवण्यात यश आले. रुमानाने 3 षटके गोलंदाजी करताना 27 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तिच्याव्यतिरिक्त सलमा खातून हिनेही 1 विकेट घेत संघासाठी योगदान दिले.
भारतीय संघाचा हा स्पर्धेतील पाचवा सामना होता. यापूर्वी झालेल्या चार सामन्यांपैकी 3 सामन्यात भारताने विजय मिळवला होता, तर एका सामन्यात पाकिस्तान महिलांविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. आता या सामन्यात विजय मिळवत भारताने गुणतालिकेतील पहिले स्थान कायम राखले आहे. भारताचे 8 गुण असून नेट रनरेट 2.590 इतका आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टीम इंडियाच्या ‘या’ वेगवान गोलंदासाठी मिळाला पर्याय, संघात लवकरच होणार सामील
गजब बेइज्जती! विराटविरुद्ध तोंडातून शब्द काढणाऱ्या रमीज राजांची पाकिस्तानी दिग्गजाने उडवली खिल्ली






