---Advertisement---

शाब्बास पोरींनो! आयर्लंडला धूळ चारत सलग दुसऱ्यांदा टीम इंडिया टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत

Indian Womens Team
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघाने आपला अखेरचा साखळी सामना आयर्लंडविरुद्ध खेळला. पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण न होऊ शकलेल्या या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 5 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत जागा पटकावली. उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.

https://twitter.com/BCCIWomen/status/1627704215111090176?t=nfTNwa-WdP9PIukMOHf6hQ&s=19

पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पराभूत केले होते. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. आपला 150 वा सामना खेळत असलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिचा हा निर्णय सलामीवीर शफाली वर्मा व स्मृती मंधाना यांनी योग्य ठरवला. दोघींनी 9.2 षटकात 62 धावांची सलामी दिली. शफाली 24 धावांवर बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौर फलंदाजीला उतरली. मात्र, ती 13 धावाच करू शकली. असे असताना स्मृतीने एक बाजू लावून धरत सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. बाद होण्यापूर्वी तिने 56 चेंडूवर 9 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 87 धावांची खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्जने 19 धावांची खेळी करत संघाला 155 पर्यंत पोहोचवले.

स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी उतरलेल्या आयर्लंड संघाची सुरुवात खराब झाली. एमी हंटर पहिल्याच चेंडूवर धावबाद होत परतली. तर, रेणुकाने ओर्लाचा त्रिफळा उडवला. मात्र, त्यानंतर लॉरा डेलानी व गॅबी लुईस यांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. पावसामुळे खेळ थांबेपर्यंत या दोघींनी संघाला 8.2 षटकात 54 पर्यंत मजल मारून दिली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा आयर्लंड डकवर्थ-लुईस नियमानुसार पाच धावांनी मागे होता. अखेर पुन्हा खेळ सुरू झाल्याने भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले. स्मृती मंधाना हिला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.

(india womens beat ireland in t20 world cup entered in semi finals)

बातमी अपडेट होत आहे…

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेकॉर्डब्रेकर हॅरी! कोणताही भारतीय पुरूष क्रिकेटपटू न करू शकलेली कामगिरी हरमनच्या नावे 
केवळ ‘त्या’ दोन खेळ्यांमुळे फ्लॉप असूनही राहुलला मिळतेय संधी, रोहितच करतोय पाठराखण 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---