---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या ‘लेडी ब्रिगेड’ची घोषणा; संघात अनेक चकित करणारी नावे

On: शुक्रवार, ऑगस्ट 19, 2022 9:33 PM
---Advertisement---

बर्मिंघम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ही स्पर्धा गाजवत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली व रौप्य पदक आपल्या नावे केले. आता सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. त्या दौऱ्यासाठी भारताच्या संघाची घोषणा झाली असून, अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने संघात पुनरागमन केले आहे.

https://twitter.com/BCCIWomen/status/1560635260110401536?t=5EofZq2sS1XDYpIYOUB4IA&s=19

भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे व तीन सामन्यांची टी२० मालिका खेळेल. १० सप्टेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी प्रत्येकी १७ सदस्यीय संघांची घोषणा केली गेली आहे. हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल तर स्मृती मंधाना उपकर्णधार असणार आहे.

टी२० संघाचा विचार केला गेल्यास संघात नाममात्र बदल केले गेले आहेत. यष्टीरक्षक यस्तिका भाटिया हिच्या जागी रिचा घोषचा संघात समावेश केला गेला आहे. तसेच अष्टपैलू डी हेमलता हीने देखील संघात पुनरागमन केले. वुमेन्स टी२० चॅलेंजमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी महाराष्ट्राची किरण नवगिरे हिला पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात निवडले गेले.

वनडे संघात भारताची सर्वात अनुभवी महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिचा आश्चर्यकारकरीत्या समावेश केला गेला. वनडे संघात याव्यतिरिक्त बदल झाला नाही.

वनडे संघ-

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, एस मेघना, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, डी हेमलता, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी, हरलीन देओल.

टी२० संघ-

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राधा यादव, एस मेघना, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, डी हेमलता, सिमरन दिल बहादूर, किरण नवगिरे.

महत्त्वाच्या बातम्या-

इरफान पठाण अन् केकेआरच्या सीईओंमध्ये मजेशीर वॉर! ट्वीट द्वारे एकमेकांची घेतली मजा

आता थेट ८८ वर्षाच्या दिग्गजाने विराटला दिला फॉर्ममध्ये येण्यासाठी सल्ला

केरळचा इंजिनीयर बनला युएईचा कॅप्टन! आता भारताशीच करणार दोन हात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---