मंगळवार, दिनांक १३ एप्रिल २०२१ रोजी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारतीय महिला आणि इंग्लंड महिला संघादरम्यान होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जूनमध्ये भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून दोन्ही संघाच्या दरम्यान यावेळी एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळवण्यात येणार आहे.
भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्या दरम्यान एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे तबब्ल ६ वर्षांनी भारतीय महिला संघ कसोटी खेळताना दिसणार आहे. यापूर्वी भारतीय महिला संघाने नोव्हेंबर २०१४ साली शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तसेच इंग्लंड संघ २०१९ साली झालेल्या ऍशेस मालिकेनंतर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळले.
भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघात होणारा एकमेव कसोटी सामना ब्रिस्टोल येथे १६ ते १९ जून दरम्यान होईल. त्यानंतर तीन एकदिवसीय सामने २७ जून, ३० जून आणि ३ जुलै रोजी खेळवले जातील. यानंतर टी२० मालिका ९ जुलैपासून सुरू होईल आणि ही मालिका १५ जुलैपर्यंत चालणार आहे.
इंग्लंड-भारत सामन्यांच्या संदर्भात बोलताना इंग्लंडची कर्णधार हिथ नाईट म्हणाली की, ‘भारताविरुद्ध खेळायला मी खूप उत्सुक आहे.’ ती पुढे म्हणाली की, ‘कोविड १९ चा काळ खूपच खडतर होता. परंतु आता नव्याने खेळायला आम्ही उत्सुक आहोत.’
स्काय स्पोर्ट्स वाहिनीशी बोलताना ती म्हणाली की, ‘आमचे वेळापत्रक खूप व्यस्त झाले आहे हे एक प्रकारे चांगलेच झाले आहे. मागील वर्ष खूप कठीण होते. आम्हाला त्या वेळेला कळत नव्हते की आता काय चालू आहे आणि भविष्यात काय होऊ शकते.’
भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक –
एकमेव कसोटी सामना – १६ ते १९ जून, ब्रिस्टोल
पहिला एकदिवसीय – १७ जून, ब्रिस्टोल
दुसरा एकदिवसीय – ३० जून, टॉन्टन
तिसरा एकदिवसीय – ३ जुलै, वॉरेस्टर
पहिला टी२०- ९ जुलै, नॉर्थॅम्प्टन
दुसरा टी२० – ११ जुलै, होव
तिसरा टी२० – १५ जुलै, चेम्सफोर्ड
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या टी२० मध्ये पाकिस्तानचे कंबरडे मोडणारा कोण आहे जॉर्ज लिंड, घ्या जाणून
रोहितचे अर्धशतक हुकले पण केला ‘हा’ मोठा कारनामा; आता केवळ विराट आणि रैना आहेत पुढे
दे घुमा के! सुर्यकुमारचा ९९ मीटरला हेलिकॉप्टर षटकार पाहून हार्दिक पंड्याही झाला थक्क, पाहा व्हिडिओ