दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघ बुधवारी (15 फेब्रुवारी) वेस्ट इंडीज संघाशी दोन हात करेल. आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला मात दिल्यानंतर भारतीय संघ हा सामना जिंकून आपली विजय कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल. भारतीय संघाची नियमित उपकर्णधार स्मृती मंधाना ही या सामन्यासाठी तंदुरुस्त होऊन उपलब्ध असणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भारतीय संघाचा ब गटात समावेश आहे. आपल्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला सात गड्यांनी मात दिली होती. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 150 धावांचे आव्हान भारताने जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद अर्धशतकी व रिचा घोष हिच्या आक्रमक 31 धावांमुळे एक षटक बाकी असतानाच पार केले. त्यामुळे वेस्ट इंडीजला पराभूत करत पुढील फेरीच्या दिशेने प्रवास करण्याचा भारतीय संघाचा मनसुबा असेल.
वेस्ट इंडीज संघाला आपल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागलेला. स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिज संघदेखील प्रयत्नांची शर्थ करताना दिसेल.
भारतीय संघ या सामन्यासाठी कशी प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरतो याकडे देखील अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. स्मृती मंधाना पूर्णपणे तंदुरुस्त असल्यास तिची संघात जागा बनेल. ती संघात परतल्यास यास्तिका भाटिया व हरलीन देओल यांच्यापैकी एकीला बाहेर बसावे लागू शकते. गोलंदाजी विभागात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 6.30 वाजता सुरू होईल. हा सामना देखील केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावरच खेळला जाणार आहे.
संभाव्य भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मंधाना भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग.
(India Womens Play 2nd Match Against West Indies In Womens T20 World Cup Smriti Might Comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कोहली खोटं बोलला, 9 लोक साक्षीला आहेत’, विराट-गांगुली वादावर चेतन शर्मांचा मोठा दावा
‘आम्ही पाच जण संपूर्ण भारताचे क्रिकेट चालवतो’, स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मांची बडी बात