---Advertisement---

बीसीसीआयने श्रीलंका टी20 मालिकेसाठी 15 सदस्यीय टीम इंडियाची केली घोषणा! 21 डिसेंबरपासून मालिकेला सुरुवात

On: मंगळवार, डिसेंबर 9, 2025 8:01 PM
---Advertisement---

बीसीसीआयने (BCCI) श्रीलंकाविरुद्धच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या टी20 मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) संघाची कर्णधार असेल, तर स्मृती मानधना (Smriti Mandhna) उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.

2025 चा एकदिवसीय (ODI) विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ आपली ही पहिलीच मालिका खेळणार आहे. शेफाली वर्माला टी20 संघात स्थान मिळाले आहे. तिने 2025 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये प्रतिका रावलची जागा घेतली होती. तिने देशांतर्गत क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी केली आहे. युवा यष्टीरक्षक-फलंदाज जी कमलिनी आणि 19 वर्षीय फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्मा यांना पहिल्यांदाच संघात संधी मिळाली आहे. या दोघी याच वर्षी झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होत्या.

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार)
स्मृती मानधना (उपकर्णधार)
दीप्ती शर्मा
स्नेह राणा
जेमिमाह रॉड्रिग्स
शेफाली वर्मा
हरलीन देओल
अमनजोत कौर
अरुंधती रेड्डी
क्रांती गौड
रेणुका सिंग ठाकूर
ऋचा घोष (यष्टीरक्षक)
जी कमलिनी (यष्टीरक्षक)
श्री चरणी
वैष्णवी शर्मा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---