भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी (27 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड केली आहे. लखनऊ येथे भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात 7 मार्चपासून 5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद मिताली राजकडे तर उपकर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे. तसेच टी20 संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत सांभाळेल. या दोन्ही संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे, ज्यांनी अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही.
यामध्ये 21 वर्षीय मोनिका पटेल, 22 वर्षीय सी प्रत्यूषा, 21 वर्षीय यस्तिका भाटिया, 20 वर्षीय आयुषी सोनी, 21 वर्षीय सिमरन दिल बहादुर आणि 24 वर्षीय श्वेता वर्माचा समावेश आहे. या सहाही जणींना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी असेल.
मोनिका पटेल आणि सी प्रत्यूषा यांना भारताच्या वनडे आणि टी20 अशा दोन्ही संघात संधी देण्यात आली आहे. तसेच यस्तिका भाटिया आणि यष्टीरक्षक फलंदाज असलेली श्वेता वर्मा हीला वनडे संघात संधी मिळाली आहे; तर यष्टीरक्षक फलंदाज सिमरन आणि आयुषी सोनी यांना टी20 संघात संधी मिळाली आहे.
तसेच या दोन्ही संघात शिखा पांडे, वेदा कृष्णमुर्ती, एकता बिश्त आणि तानिया भाटीया या अनुभवी खेळाडूंचा समावेश नाही.
असा आहे वनडे संघ –
मिताली राज (कर्णधार), स्म्रीती मंधाना, जेमीमह रॉड्रिग्स, पुनम राऊत, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), डी. हेमलथा, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), श्वेता वर्मा (यष्टीरक्षक) ), राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रत्युषा, मोनिका पटेल
असा आहे टी20 संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधाना (उपकर्णधार), शाफाली वर्मा, जेमीमह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष, हर्लीन देओल, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), नुजत परवीन (यष्टीरक्षक), आयुषी सोनी, अरुंधती रेड्डी , राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, मानसी जोशी, मोनिका पटेल, सी. प्रत्युषा, सिमरन दिल बहादूर
भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला वनडे मालिकेचे वेळापत्रक –
7 मार्च – पहिला वनडे सामना – लखनऊ
9 मार्च – दुसरा वनडे सामना – लखनऊ
12 मार्च – तिसरा वनडे सामना – लखनऊ
14 मार्च – चौथा वनडे सामना – लखनऊ
17 मार्च – पाचवा वनडे सामना – लखनऊ
भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला टी20 मालिकेचे वेळापत्रक –
20 मार्च – पहिला टी20 सामना – लखनऊ
21 मार्च – दुसरा टी20 सामना – लखनऊ
23 मार्च – तिसरा टी20 सामन – लखनऊ
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईकर अय्यरचा फलंदाजीत बल्ले बल्ले! सलग २ सामन्यात झुंजार शतकं, आता इंग्लंडला पाजणार पराभवाचं पाणी
पाकिस्तानी युवा वेगवान गोलंदाजाची कमाल, टी-२० सामन्यात १०० बळी घेत मोडला जसप्रीत बुमराहचा विक्रम
मराठी भाषा गौरव दिन विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे महाराष्ट्रीयन फलंदाज