काल (2 मार्च) जंक्शन ओव्हल (Juction Oval) येथे श्रीलंका महिला संघ विरुद्ध बांगलादेश महिला संघात (Sri Lanka Womens vs Bangladesh Womens) आयसीसी आंतरराष्ट्रीय टी20 विश्वचषकातील (ICC Womens T20 World Cup) 17वा सामना पार पडला. हा सामना श्रीलंका महिला संघाने 9 विकेट्सने जिंकला.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर श्रीलंका संघाची अष्टपैलू क्रिकेटपटू शशिकला सिरिवर्धनेने (Shashikala Siriwardene) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे.
त्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाने तिने महिला क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान केला आहे.
भारतीय महिला संघ विरुद्ध श्रीलंका महिला संघ यांच्यात 29 फेब्रुवारीला टी20 विश्वचषकातील सामना पार पडला. या सामन्यानंतर भारतीय महिला संघाने शशिकलासाठी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या जर्सीवर शुभेच्छा लिहून स्वाक्षऱ्या केल्या आणि ही जर्सी भारतीय संघाची प्रतिभावान क्रिकेटपटू स्म्रीती मंधानाने (Smriti Mandhana) शशिकलाला भेट दिली.
Today's game against Bangladesh will be Shashikala Siriwardena's last for Sri Lanka 😢
After her last match against India, she was gifted a shirt signed by the whole of Harmanpreet Kaur's team ✍️
A lovely gesture 👏
📸: Shashikila Siriwardena | #T20WorldCup pic.twitter.com/7paCu4fA0P
— T20 World Cup (@T20WorldCup) March 1, 2020
2003 मध्ये विंडीज महिला संघाविरुद्ध वनडे सामन्यातून पदार्पण करणाऱ्या शशिकलाने आतापर्यंत 118 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने 18.44 च्या सरासरीने 2029 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तिने 81 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यात 17.14 च्या सरासरीने 1097 धावा केल्या आहेत.
याव्यतिरिक्त शशिकलाचे गोलंदाजीतही उत्कृष्ट योगदान आहे. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 201 विकेट्सही घेतल्या आहेत.
तसेच सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषकातील 3 सामन्यात तिने 18 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना तिने 7 विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी 4 विकेट्स तिने काल झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात घेतल्या.
या विश्वचषकातील साखळी फेरीच्या पहिल्या 3 सामन्यात पराभूत झाल्याने श्रीलंका महिला संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–न्यूझीलंडचा ‘हा’ गोलंदाज म्हणतो विराटला चूका करताना पाहून खूप छान वाटले…
–तर कोहलीच्या जागी हा खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार
–न्यूझीलंडची कसोटी चॅम्पियनशीपमध्ये मोठी भरारी, जाणून घ्या टीम इंडियाचे गुण