---Advertisement---

टीम इंडियाकडून 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचा सुफडा साफ, 36 वर्षांच्या विक्रमाला धक्काही लागला नाही

On: रविवार, फेब्रुवारी 19, 2023 1:53 PM
Team-India
---Advertisement---

भारतीय संघाने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. हा विजय मिळवताच भारतीय संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात केएस भरत, चेतेश्वर पुजारा यांच्यासोबत आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनीही सिंहाचा वाटा उचलला आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाने मागील 36 वर्षांचा दिल्ली कसोटी जिंकण्याचा विक्रमही कायम ठेवला.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने फलंदाजीला येत 263 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 262 धावा केल्या. दुसऱ्या डावात 1 धावेची आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने 113 धावा चोपल्या. अशाप्रकारे भारतीय संघापुढे विजयासाठी 115 धावांचे आव्हान होते. हे आव्हान हे आव्हान भारतीय संघाने 26.4 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केले. भारतासाठी चेतेश्वर पुजारा याने विजयी शॉट चौकार मारत सामना जिंकून दिला.

उभय संघाचा दुसरा डाव
भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा (31) आणि चेतेश्वर पुजारा (नाबाद 31) यांनी सर्वाधिक धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त केएस भरत (नाबाद 23), विराट कोहली (20) आणि श्रेयस अय्यर (12) यांनी मोलाचे योगदान दिले. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना नेथन लायन याने 2 विकेट्स आणि टॉड मर्फी याने 1 विकेट नावावर केली.

त्याआधी ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ट्रेविस हेड याने सर्वाधिक (43) धावांचे योगदान दिले. या धावा करण्यासाठी त्याला 46 चेंडू खेळावे लागले. तसेच, फक्त मार्नस लॅब्युशेन यानेच 35 धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नव्हती. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा याने 7 विकेट्स आणि आर अश्विन याने 3 विकेट्स नावावर केल्या.

पहिला डाव
तत्पूर्वी पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांवर संपुष्टात आला होता. त्यांच्याकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 81 धावांचे योगदान दिले होते. तसेच, पीटर हँड्सकाँब यानेही नाबाद 72 धावा कुटल्या होत्या. त्यांच्याव्यतिरिक्त कर्णधार कमिन्स (33) याला वगळता इतर एकाही फलंदाजाने 20 धावांचा आकडा पार केला नव्हता.

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 विकेट्स खिशात घातल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून अक्षर पटेल याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 115 चेंडूंचा सामना करत 74 धावा केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त विराट कोहली याने 44 धावांचे योगदान दिले. तसेच, आर अश्विन (37), रोहित शर्मा (32), रवींद्र जडेजा (26) आणि केएल राहुल (17) यांनी दोन आकडी धावसंख्या करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. मात्र, आव्हान एक धाव दूरच राहिले. मात्र, शेवटी भारतानेच हा कसोटी सामना खिशात घातला.

यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना नेथन लायन याने विकेट्सचे पंचक पूर्ण केले. त्याने भारताच्या 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्याव्यतिरिक्त मॅथ्यू कुह्नेमन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, कर्णधार पॅट कमिन्स याने एक विकेट नावावर केली होती. (India won 2nd test by 6 wickets read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किंग कोहलीचा भीम पराक्रम! 25000 धावांचा टप्पा पार करताच मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चाही World Record
बिग ब्रेकिंग! सौराष्ट्र संघ बनला रणजी ट्रॉफी 2023चा चॅम्पियन, 3 वर्षात दुसऱ्यांदा पटकावला किताब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---