---Advertisement---

रोहितचा हिटमॅन अंदाज, ऑस्ट्रेलिया गोत्यात! टीम इंडिया इंग्लंड सोबत करणार हिशोब चुकता?

On: मंगळवार, जून 25, 2024 9:37 AM
---Advertisement---

भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. 27 जून रोजी खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येतील. उपांत्य फेरीत जाण्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाकडून बदला घेतला आणि आता इंग्लंडसोबत टी20 विश्वचषक 2022 चा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे.

2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करुन विजेतेपद पटकावले होते. आता टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून त्या पराभवाचा बदला घेतला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका होता. आता इंग्लंडकडून बदला घेण्याची पाळी आहे.

मागील 2022 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात इंग्लंड संघाने भारताचा उपांत्य फेरीत पराभव केला होता. योगायोगाने या विश्वचषकातही भारताला इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे. गेल्या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून लाजिरवाणा पराभव केला होता. आता यावेळी टीम इंडिया मागील पराभवाचा बदला घ्यायला मैदानात उतरेल.

ॲडलेड ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या होत्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 16 षटकांत एकही विकेट न गमावता 170 धावा करत विजय मिळवला. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 49 चेंडूंत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 80* धावा केल्या आणि त्याच्यासोबत सलामी देणाऱ्या ॲलेक्स हेल्सने 47 चेंडूंत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 86* धावा केल्या होत्या. यंदाच्या विश्वचषकातील भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 27 जून रोजी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामना सुरू होईल.

महत्तवाच्या बातम्या-

भारतानं केलं ऑस्ट्रेलियाचं अवघड, 24 धावांनी मात देत सेमी फायनलमध्ये थाटात एंट्री!
ब्रेकिंग न्यूज! बीसीसीआयकडून आगामी झिम्बाब्वे दाैर्यासाठी भारतीय संघाची घोषणा!
वेस्ट इंडिज स्पर्धेतून बाहेर! जाणून घ्या दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाची 3 मोठी कारणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---