आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) 7वा सामना भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात दुबईच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 गडी राखून शानदार विजय मिळवला. या सामन्यात अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटीलच्या धारदार गोलंदाजीमुळे भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला.
रविवारी (10 ऑक्टोबर) रोजी महिला टी20 विश्वचषकातील अ-गटातील सामन्यात भारताने चुरशीने गोलंदाजी करत पाकिस्तानला 8 विकेट्सवर 105 धावांवर रोखले. भारताने लक्ष्याचा पाठलाग 18.5 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात केला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अरुंधती रेड्डीला देण्यात आला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच विजय ठरला आहे. या विजयासह भारत-अ गटात चौथ्या स्थानावर आला आहे.
या सामन्यात पाकिस्तानने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 105 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 18.5 षटकात लक्ष्य गाठले. भारतासाठी स्टार सलामीवीर शफाली वर्माने (Shafali Verma) 35 चेंडूत 32 धावा केल्या. दरम्यान तिने 3 चौकार लगावले. स्म्रीती मानधना (Smriti mandhana) 7, जेमिमाह राॅड्रिग्ज 23, कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) 29 धावांच्या खेळीवर भारताने विजय मिळवला. भारतीय संघ आता आपला पुढचा सामना 9 ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रिचा घोषचा अद्भूत झेल, चाहत्यांना आली धोनीची आठवण; VIDEO पाहून विश्वासच बसणार नाही!
धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार का? या दिवशी जाहीर होईल निर्णय
“संजू सॅमसनमुळे मला पुन्हा संधी मिळाली”, आयपीएलमध्ये कहर करणाऱ्या खेळाडूचा मोठा खुलासा