भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यापूर्वीच मालिका खिशात घातलेल्या भारतीय संघाने हा सामना 90 धावांनी आपल्या नावे करत पाहुण्या न्यूझीलंड संघाला क्लीन स्वीप केले. भारताने यासह घरच्या मैदानावरील आपली सत्ता अबाधित राखली.
हैदराबाद व रायपुर येथील पहिले दोन सामने जिंकत भारताने ही मालिका आधीच आपल्या नावे केली होती. इंदोर येथील या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. फलंदाजांनी उभारलेल्या मोठ्या धावसंख्येनंतर गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत 90 धावांनी हा विजय नावे केला. भारतीय संघाने 2019 पासून घरच्या मैदानावर अद्याप एकही वनडे मालिका गमावलेली नाही.
भारताने डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडीजविरूद्ध 2-1 असा विजय मिळवत या विजयी अभियानाची सुरुवात केलेली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया व इंग्लंडला 2-1 असे पराभूत करत भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवलेली. मागील वर्षी वेस्ट इंडीजला 3-0 अशी मात भारतीय संघाने दिलेली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला ही भारताने 2-1 असे नमवले. नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने श्रीलंकेला 3-0 असे पराभूत करत सलग सहावा वनडे मालिका विजय मिळवलेला. त्यानंतर आता न्यूझीलंडलाही क्लीन स्वीप करत भारतीय संघाने आपला हा पराक्रम आणखी पुढे नेला आहे.
या अखेरच्या सामन्याचा विचार केल्यास भारताने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 385 धावांचा डोंगर उभारला. कर्णधार रोहित शर्मा (101) व शुबमन गिल (112) यांनी संघासाठी द्विशतकी सलामी दिली. त्यानंतर हार्दिक पंड्याने अर्धशतक झळकावले. भारताने उभारलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडने काहीसा संघर्ष केला. सलामीवीर डेवॉन कॉनवे याने एकाकी झुंज देत 138 धावांची खेळी केली. कुलदीप यादव व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत भारताला 90 धावांनी विजय मिळवला.
(India Won Consecutive 7 Th ODI Series At Home Soil)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोरमध्येही टीम इंडियाचा जयजयकार! वनडे मालिकेत न्यूझीलंडला केले क्लीन स्वीप
टी20 मालिकेआधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन! दुखापतीमुळे प्रमुख खेळाडू थेट एनसीएमध्ये दाखल