बर्मिंघम येथे कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये रविवारी (३१ जुलै) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. भारतीय संघाने या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीत धडाकेबाज प्रदर्शन करत पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने ८ विकेट्सने हा सामना जिंकत कॉमनवेल्थ गेम्समधील आपल्या विजयाचे खाते उघडले. मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३ विकेट्सने पराभूत केले होते.
या सामन्याच्या सुरुवातीला पावसाचा व्यत्यय आल्याने १८ षटकांचा खेळ घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ निर्धारित १८ षटकात ९९ धावांवरच गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १२ व्या षटकातच पाकिस्ताचे लक्ष्य पूर्ण केले.
पाकिस्तानच्या नाममात्र १०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर स्म्रीती मंधाना हिने मॅच विनिंग प्रदर्शन केले. तिने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेत ताबडतोब डावाखेर नाबाद ६३ धावा फटकावल्या. ४२ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ही शानदार खेळी केली. तसेच शेफाली वर्मा (१६ धावा) आणि शब्बीनेनी मेघना (१४ धावा) यांनीही योगदान दिले. परिणामी भारतीय संघाने ११.४ षटकातच सामना जिंकला.
https://twitter.com/ICC/status/1553731770683895808?s=20&t=cEsxryU_wKoDl0JjraVUMw
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या फलंदाजांना विशेष प्रदर्शन करता आले नव्हते. पाकिस्तानकडून सलामीवीर आणि यष्टीरक्षक मुनीबा अली हिने सर्वाधिक ३२ धावा केल्या होत्या. तिच्याखेरीज एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. आलिया रियाज (१८ धावा), कर्णधार बिस्माह मरूफ (१७ धावा), ओमायमा सोहेल आणि आयेशा नसीम (१० धावा) यांना दुहेरी धावा करता आल्या. याखेरीज इतर ६ फलंदाज एकेरी धावाच करू शकल्या.
या डावात राधा यादव आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच रेणुका सिंग, मेघना सिंग आणि शेफाली वर्मा यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बॉक्सिंग चॅम्पियन वडिलांना जे जमलं नाही, ते १९ वर्षांच्या लेकाने करून दाखवलं, थेट ‘गोल्ड’ आणले घरी
‘या’ १८ वर्षीय पठ्ठ्याचा टी२० विश्वचषकात धुमाकूळ, रोहित-विराटला मागे सोडत विश्वविक्रमांची घातली रास
कॅप्टन रोहित होणार आणखीनच हीट! दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराला टाकणार मागे