शानदार… जबरदस्त… झिंदाबाद!
भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघांमधील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना (११ फेब्रुवारी) टीम इंडियाने शानदार कामगिरीसह जिंकला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव करत, पाहुण्यांना ‘व्हाईट वाॅश’चा दणका देत मालिकाही खिशात टाकली. (India Won ODI Series Against West Indies)
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अहमदाबादेतील ‘श्री नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर’ (Narendra Modi Cricket Stadium) सलग तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर ५० षटकात २६५ धावांची मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला आश्वासक सुरूवात मिळाली नाही. आणि ठराविक अंतराने एकापाठोपाठ एक विकेट्स गेल्याने वेस्ट इंडिज संघाने मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामनाही ९६ धावांच्या मोठ्या फरकाने गमावला.
3RD ODI. India Won by 96 Run(s) https://t.co/yrDtxuQxRQ #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 11, 2022
भारताकडून फलंदाजीत श्रेयस अय्यर, रिषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी साकारली तर. गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णा, कुलदिप यादव, दिपक चाहर, मोहम्मद सिराज यांनी चमकदार कामगिरी केली.
Innings Break!#TeamIndia post 265 on the board in the third & final @Paytm #INDvWI ODI!
8⃣0⃣ for @ShreyasIyer15
5⃣6⃣ for @RishabhPant17
3⃣8⃣ for @deepak_chahar9
3⃣3⃣ for @Sundarwashi5Over to our bowlers now. ???? ????
Scorecard ▶️ https://t.co/9pGAfWtQZV pic.twitter.com/5DygXyCboX
— BCCI (@BCCI) February 11, 2022
वेस्ट इंडीज संघाकडून गोलंदाजीत अल्झारी जोसेफ, जेसन होल्डर, हीडेन वाॅल्श यांनी प्रत्येकी २, ४, २ बळी घेतले. तर, फलंदाजीत कर्णधार पूरन आणि ओडेन स्मिथ यांशिवाय इतर कुणालाही लय पकडता आली नाही.
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर (८०) व रिषभ पंत (५६) यांच्या अर्धशतकाच्या तसेच खालच्या फळीत दीपक चहर व वॉशिंग्टन सुंदर यांनी उपयुक्त योगदान देत भारताला २६५ पर्यंत मजल मारून दिली होती.
रोहित शर्माच्या नेतृत्वात २०२२ मध्ये भारताने हा पहिलाच मालिका विजय प्राप्त केला आहे.
पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ प्रथमच वनडे मालिका खेळत होता. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने मालिका विजय मिळवला होता. याआधी नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेतही भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्वात ३-० असा शानदार विजय मिळवला होता.






