---Advertisement---

…तर रोहित शर्मा बनणार धोनी, रैनानंतरचा असा पराक्रम करणारा तिसराच कर्णधार

On: रविवार, नोव्हेंबर 4, 2018 3:35 PM
---Advertisement---

कोलकता। भारत विरुद्ध विंडीज संघात आज(4 नोव्हेंबर) पासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज इडन गार्डन स्टेडीयमवर होणार आहे.

या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माला विंडीज विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात विजय मिळवणारा केवळ तिसराच भारतीय कर्णधार ठरण्याची संधी आहे.

भारत आणि विंडीज संघात आत्तापर्यंत 8 टी20 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील 5 सामन्यात विंडीजने बाजी मारली आहे. तर भारताला केवळ दोन सामने जिंकण्यात यश आले आहे. तसेच एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

भारताने विंडीज विरुद्ध शेवटचा टी20 सामना 2014 मध्ये जिंकला आहे. हा सामना टी20 विश्वचषकात झाला होता. त्यावेळी भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवला होता.

तसेच त्याआधी भारताने 2011 मध्ये सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली विंडीज विरुद्ध पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात विजय मिळवला होता.

त्यामुळे रोहितला विंडीज विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात विजय मिळवणारा रैना आणि धोनी नंतरचा तिसराच कर्णधार बनण्याची संधी आहे.

विंडीज विरुद्धच्या या टी20 मालिकेसाठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थित रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

२०१९च्या आयपीएल आधी विरेंद्र सेहवागने घेतला मोठा निर्णय; ट्विटरवरुन दिली माहिती

ISL 2018: फॉर्मामध्ये असलेल्या जमशेदपूर संघाचे दिल्लीला आव्हान

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment