पार्ल। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२१ जानेवारी) होणार आहे. पार्लच्या बोलंड पार्क येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. तसेच दक्षिण आफ्रिकेने एक बदल केला आहे. त्यांनी मार्को यान्सिन ऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात सिसांडा मगाला याला संधी दिली आहे. यान्सिनला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
भारतासाठी ‘करो वा मरो’ सामना
भारतीय क्रिकेट संघासाठी हा सामना ‘करो वा मरो’ स्थितीतील आहे. कारण, या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने ३१ धावांनी जिंकला आहे. त्याचबरोबर मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर मालिकेत बरोबरी होईल आणि तिसरा सामना निर्णायक ठरेल. मात्र, जर भारताने दुसरा सामना गमावला, तर मात्र भारताला मालिकाही गमवावी लागेल.
असा आहे आमने-सामने इतिहास
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आत्तापर्यंत ८५ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ३५ सामन्यात भारताने विजय मिळवला असून ४७ सामन्यात पराभव पत्करला आहे. तसेच ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. तसेच यातील ३५ सामने दक्षिण आफ्रिकेत झाले असून भारताने १० सामने जिंकले आहेत आणि २३ सामने पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर २ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
Unchanged XI for #TeamIndia.
Live action to begin shortly https://t.co/iWvgXYHpzl #SAvIND pic.twitter.com/tjy23hzGWF
— BCCI (@BCCI) January 21, 2022
असे आहेत ११ जणांचे संघ –
भारत : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जानेमन मालन, एडेन मार्करम, रॅसी वॅन डर ड्युसेन, तेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड मिलर, अँडिल फेहलुक्वायो, सिसांडा मगाला, केशव महाराज, तब्राईझ शम्सी, लुंगी एन्गिडी
महत्त्वाच्या बातम्या –
लेजेंड्स क्रिकेट लीग: इंडिया महाराजा संघाची विजयी सलामी; आशिया लायन्सवर ६ गडी राखून विजय
धोनीचा टीसी असतानाचा रोल परफेक्ट जमावा, म्हणून कष्टाळू सुशांतने खरोखर केले होते टीसीचे काम
वेंकटेशला मिळणार डच्चू? दुसर्या वनडेत अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन