ओमानच्या मस्कतमध्ये लेजेंड्स क्रिकेट लीग २०२२ (Legends cricket league) स्पर्धेचा पहिला हंगाम सुरू आहे. या स्पर्धेला गुरुवार (२० जानेवारी) पासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात इंडिया महाराजा (India maharajas) आणि आशिया लायन्स (Asia lions) संघ आमने-सामने होते. स्टार खेळाडूंनी नटलेल्या या संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. परंतु, इरफान पठाण आणि युसुफ पठाणच्या फलंदाजीसमोर आशिया लायन्स संघाच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. हा सामना इंडिया महाराजा संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
इंडिया महाराजा संघाकडून युसुफ पठाणची तुफान फटकेबाजी
इंडिया महाराजा संघाकडून फलंदाजी करताना युसुफ पठाणने (Yusuf Pathan) तुफान फटकेबाजी केली. त्याने अवघ्या ४० चेंडूंमध्ये ८० धावांची खेळी करत सामना आपल्या दिशेने वळवून घेतला. त्याने अवघ्या २८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ९ षटकार मारले होते, तर नमन ओझाने १९ चेंडूंमध्ये २० धावांची खेळी केली होती.
इंडिया महाराजा संघाची फलंदाजी सुरू असताना एकवेळ असे वाटू लागले होते की, भारतीय संघ हा सामना गमावणार. परंतु, इंडिया महाराजा संघातील फलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. इंडिया महाराजा संघाची धावसंख्या ६.१ षटकात ३ बाद ३४ इतकी होती. परंतु, त्यानंतर युसुफ पठाण आणि मोहम्मद कैफ यांनी शतकी भागीदारी केली. मोहम्मद कैफने ३७ चेंडूंमध्ये ४२ धावांची खेळी केली.
80 runs in 40 balls.
Making every hit count.A strike rate of 200!
It took one man and the lions were outnumbered!Ladies and gentlemen, raise a toast for the Howzat Legend of the Match- Yusuf Pathan.@iamyusufpathan#GameofGOATS #Howzat #LegendsLeagueCricket #LLCT20 pic.twitter.com/4xVZbWfFQN
— Legends League Cricket (@llct20) January 20, 2022
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर इंडिया महाराजा संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना आशिया लायन्स संघाने इंडिया महाराजा संघासमोर १७६ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान इंडिया महाराजा संघाने ५ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केले होते. आशिया लायन्स संघाकडून उपुल थरांगाने ६६ धावांची खेळी केली, तर कामरान अकमलने २५ धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या :
मोठा बातमीः भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने, याचवर्षी ‘या’ दिवशी खेळणार सामना
“स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे…” बीबीएल पदार्पणानंतर उन्मुक्त झाला भावूक
हे नक्की पाहा:





