---Advertisement---

तिसऱ्या टी20 मध्ये नाणेफेकीचा कौल हार्दिकच्या बाजूने! घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय

On: शनिवार, जानेवारी 7, 2023 6:42 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान अखेरच्या टी20 सामन्याला राजकोट येथे सुरुवात झाली. मुंबई व पुणे येथील सामन्यानंतर मालिका बरोबरीत उभी आहे‌‌. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या या स्टेडियमवर झालेल्या नाणेफेकीत भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने या सामन्यासाठी एकही बदल केला नाही. तर, श्रीलंकेने भानुका राजपक्षे याच्या जागी अविष्का फर्नांडो याला संघात स्थान दिले.

मुंबई येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अखेरच्य चेंडूवर दोन धावांनी विजय संपादन केला होता. या सामन्यात उमरान मलिक व शिवम मावी या युवा वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली होती. मात्र, पुणे येथील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने या पराभवाचा वचपा काढला. श्रीलंकेने कर्णधार दसून शनाका व कुसल मेंडीस यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 206 धावा उभारल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी अक्षर पटेल व सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके ठोकून चांगले झुंज दिली. मात्र, भारताला अखेरीस 16 धावांनी पराभूत व्हावे लागले.

राजकोट टी20 साठी भारतीय संघ –

ईशान किशन, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, उमरान मलिक, शिवम मावी व अर्शदीप सिंग.

राजकोट टी20 साठी श्रीलंका संघ-

कुसल मेंडीस, पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, धनंजय डी सिल्वा, चमिका करूणारत्ने, दसून शनाका (कर्णधार), चरिथ असलंका, वनिंदू हसरंगा, कसून रजिथा, महिश तिक्षणा व दिलशान मधुशंका.

(India won toss and elected to bat first in rajkot T20I Against Srilanka)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा तर गोलंदाजांचा अपमान’, रन-आऊट प्रकरणात अश्विनने घेतली ऍडम झम्पाची बाजू, डेविस हसीला सुनावले
श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---