हरारे| झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात सोमवारी (२२ ऑगस्ट) तिसरा व अखेरचा वनडे सामना होणार आहे. पाहुणा भारतीय संघ या वनडे मालिकेत २-० ने विजयी आघाडीवर आहे. अशात शेवटचा सामनाही आपल्या नावावर करत मालिका ३-० ने खिशात घालण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. हा त्यांचा झिम्बाब्वेतील १४ वा सामना असेल. गेल्या ९ वर्षांत झिम्बाब्वेत भारतीय संघाने एकही पराभव पाहिलेला नाही.
या सामन्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी नाणेफेक झाली आहे. नाणेफेकीत सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुलने बाजी मारली आहे. त्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ प्रमुख बदल करण्यात आले आहेत. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना बाहेर करत दीपक चाहर आणि आवेश खान यांचे पुनरागमन झाले आहे. झिम्बाब्वे संघातही काही बदल करण्यात आले आहेत.
KL Rahul has won the toss and we will bat first in the 3rd ODI.
A look at our Playing XI for the game. Two changes for #TeamIndia
Avesh Khan and Deepak Chahar in for Siraj and Prasidh.
Live – https://t.co/ZwXNOvRwhA #ZIMvIND pic.twitter.com/Ef3AwRykMt
— BCCI (@BCCI) August 22, 2022
असे आहेत दोन्ही संघ-
भारत:
शिखर धवन, केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, कुलदीप यादव, आवेश खान
झिम्बाब्वे:
ताकुडझ्वानाशे कायटानो, इनोसंट काइया, टोनी मुन्योंगा, रेगिस चकाब्वा (यष्टीरक्षक/कर्णधार), सिकंदर रझा, शॉन विल्यम्स, रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, व्हिक्टर न्याउची, रिचर्ड नगारावा
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लॉकी फर्ग्यूसनच्या गोलंदाजीवर पूरनचा दमदार सिक्स, पाहा व्हिडिओ
ASIA CUP: शाहीनच्या अनुपस्थितीत ‘हा’ गोलंदाज बनणार टीम इंडियाची डोकेदुखी
न्यूझीलंड क्रिकेटमधील सुवर्णक्षण! इतिहासात पहिल्यांदाच केलाय ‘हा’ कारनामा