भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (१८ ऑगस्ट) खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार १२.४५ वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली असून भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/ICC/status/1560156830621306882?s=20&t=AqhzXIPxTm47EY6upDANkQ
भारतीय संघात दीपक चाहरचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहिलेला चाहर वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसेल. तसेच शुबमन गिल आणि उपकर्णधार शिखर धवन यांना सलामीवीर म्हणून संघात घेतले गेले आहे. तर इशान किशन आणि कर्णधार राहुल अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतील.
तसेच झिम्बाब्वे संघातही २ खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. नागरावा, मरुमानी यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली आहे.
https://twitter.com/BCCI/status/1560157218527330304?s=20&t=AqhzXIPxTm47EY6upDANkQ
अशी आहे प्लेइंग इलेव्हन
भारत- शिखर धवन, शुबमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, दीपक चाहर, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज
झिम्बाब्वे- तादिवानाशे मारुमणी, इनोसंट काईया, शॉन विल्यम्स, वेस्ली मधवेरे, सिकंदर रझा, रेगिस चकाब्वा (यष्टीरक्षक/कर्णधार), रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, व्हिक्टर न्याउची, रिचर्ड नगारावा
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsZIM: नाणेफेकीत राहुलची बाजी, दीर्घ काळानंतर भारतीय संघात ‘या’ खेळाडूचे पुनरागमन
‘मी आणि शेन वॉर्न एकमेकांना डेट करत होतो’, ऑस्ट्रेलियन पॉर्न स्टारच्या खुलास्याने खळबळ
पवार साहेबांचे सासरे, ज्यांनी क्रिकेटमध्ये धावांना दाखवला सरासरीचा घाट






