भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा तिसरा टी20 सामना इंदोर येथे सुरू झाला. या सामन्यात भारतीय कर्णधार कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले. तर दक्षिण आफ्रिका संघाने देखील एक बदल केला.
3RD T20I. India won the toss and elected to field. https://t.co/m8hIQQsobr #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 4, 2022
विश्वचषकासाठी भारतीय संघ 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तत्पूर्वी विराट कोहली व केएल राहुल हे आपापल्या घरी परतले आहेत. त्यामुळे भारतीय संघात बदल करणे अनिवार्य झाले. मालिका आधीच नावावर केली असल्याने या दोघांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या जागी श्रेयस अय्यर हा फलंदाजी विभागात परतला. भारतीय संघाने आपली गोलंदाजी मजबूत करण्यासाठी मोहम्मद सिराज व उमेश यादव यांना अंतिम अकरामध्ये संधी दिली गेली. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला विश्रांती देण्यात आली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने आपला प्रमुख वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किएला बाहेर करत अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियसला संधी दिली.
भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत यापूर्वीच मालिका नावावर केली आहे. या सामन्यात विजय मिळवून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघासमोर असणार आहे.
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, दीपक चहर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका–
टेंबा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ट्रिस्टन स्टब्स, रिझा हेंड्रिक्स, रायली रूसो, ऐडन मार्करम, डेव्हिड मिलर, वेन पार्नेल, केशव महाराज, कगिसो रबाडा, ड्वेन प्रिटोरियस, लुंगी एन्गिडी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या टी-20त भारतीय संघात होऊ शकतात हे महत्वाचे बदल! पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन
आता वर्ल्डकपमध्ये भारताचं काही खरं नाय! दिग्गजच म्हणालाय, ‘टीम इंडियात बुमराहसारखा कुणीच नाही’