---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध उतरणार भारताची ‘यंग ब्रिगेड’; ऋतुराजसह हे खेळाडू असणार संघाचा भाग

---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या टी२० मालिकेत सध्या विश्वचषक खेळत असलेल्या संघातील अर्ध्याहून अधिक खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्याऐवजी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना पुढील विश्वचषकाचा अनुषंगाने संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

या युवा खेळाडूंना मिळू शकते संधी
आयपीएल २०२१ मध्ये ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि सर्वाधिक बळी घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज आवेश खान यांशिवाय अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलला संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात येईल. तंदुरुस्ती आणि खराब फॉर्मशी झगडत असलेले हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार नजीकच्या काळात संघातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. पंड्याचा पर्याय म्हणून व्यंकटेश अय्यरचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

आगामी टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. तेथील खेळपट्ट्या लक्षात घेऊन निवडकर्ते जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या नावाचाही गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो. अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, दीपक चहर हे या टी२० मालिकेसाठी पुनरागमन करू शकतात. तर शुबमन गिल, मयंक अग्रवाल, उमेश यादव कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत.

रोहित निभावणार कर्णधारपद
न्यूझीलंडविरुद्ध १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत रोहित शर्माकडे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, येत्या काही दिवसांत बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीत वनडे कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या भवितव्यावरही चर्चा होणार आहे. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पायउतार होण्याचा निर्णय घेणाऱ्या कोहलीकडून वनडे संघाचे कर्णधारपदही काढून घेण्याची दाट शक्यता आहे.

विश्वचषकानंतर होणार भारत-न्यूझीलंड मालिका
विश्वचषक समाप्त झाल्यानंतर दोन दिवसातच भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान टी२० मालिकेला जयपूर येथे सुरुवात होईल. या दौऱ्यावर न्यूझीलंड संघ तीन टी२० व दोन कसोटी सामने खेळेल. न्यूझीलंड संघ टी२० मालिकेत आपला दुय्यम संघच उतरवू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकादरम्यान दिग्गज पंचांनी बायोबबलचे केले उल्लंघन, आयसीसीने केली ‘मोठी’ कारवाई

“भारतीय संघामध्ये दोन गट आहेत. एक कोहलीसोबत, तर दुसरा त्याच्या विरोधात”

‘मला आधीच माहीत होते की, ते संघर्ष करणार आहेत’, माजी दिग्गजाचे विराटसेनेवर टीकास्त्र

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---