भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग (WPL) या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आठवडाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. स्पर्धेतील पाच पैकी तीन संघांनी आपले कर्णधार आतापर्यंत जाहीर केले आहेत. त्याचवेळी आता युपी वॉरियर्झने कर्णधारासह आपल्या उपकर्णधाराच्या नावाची देखील घोषणा केली. भारतीय संघाची अष्टपैलू दीप्ती शर्मा ही संघाची उपकर्णधार असेल.
From UP. For UP. ❤️
Our Warrior vice-captain, @Deepti_Sharma06 ???? #UPWarriorz #WPL pic.twitter.com/Fd5A3el1ps— UP Warriorz (@UPWarriorz) February 25, 2023
स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर लखनऊस्थित फ्रॅंचाईजीचे नामकरण युपी वॉरियर्झ असे करण्यात आले. त्यानंतर झालेल्या खेळाडूंच्या लिलावात यूपीने एक मजबूत संघ बांधण्याचा प्रयत्न केला. 16 सदस्यीय संघात आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. नुकतेच संघातर्फे आपल्या पहिल्या कर्णधाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रेलियाची अनुभवी सलामीवीर यष्टीरक्षक एलिसा हिला पहिल्या हंगामासाठी संघाचे कर्णधार बनवण्यात आले. त्यानंतर आता उपकर्णधार म्हणून दीप्ती शर्मा हिला निवडले गेले.
दीप्ती हिला या लिलावात युपीने तब्बल 2 कोटी 60 लाख अशी मोठी रक्कम देत आपल्याकडे खेचले होते. विशेष म्हणजे ती देशांतर्गत क्रिकेट युपीसाठीच खेळते. ऑफ स्पिन गोलंदाजी तसेच डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या दीप्तीने अगदी कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले ओळख बनवली आहे. नुकत्याच झालेल्या महिला टी20 विश्वचषकात तिने टी20 क्रिकेटमध्ये 100 बळी मिळवणारी पहिली भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवलेला.
WPL 2023 साठी युपी वॉरियर्झ संघ-
सोफी एक्लस्टन, दीप्ती शर्मा (उपकर्णधार), तहलिया मॅकग्रा, शबनम इस्माइल, एलिसा हिली (कर्णधार), अंजलि सरवानी, राजेश्वरी गायकवाड, पार्श्ववी चोपडा, श्वेता सेहरावत, एस यशश्री, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, सिमरन शेख.
(Indian All Rounder Deepti Sharma Selected As UP Warriorz Vice Captain In WPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ सात कर्णधारांनी भारतात नाही जिंकली एकही कसोटी, विश्वविजेते तिघेही पराभूत
“ती काय जॉगिंग करत होती?” माजी भारतीय कर्णधार हरमनप्रीतवर संतापल्या, दिला ‘हा’ धडा