क्रिकेटमध्ये भावंडांच्या अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापैकीच एक म्हणजे हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या ही जोडी होय. हार्दिक आणि कृणाल यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी आपल्या प्रदर्शनाने चांगले नाव कमावले आहे. सध्याच्या काळात हार्दिक भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधारही बनला आहे. दोन्ही भावांना सुरुवातीपासूनच क्रिकेटपटू बनायचे होते आणि त्यांनी आपले स्वप्न सत्यातही उतरवले. यामध्ये त्यांचे वडील हिमांशू पंड्या यांचे मोलाचे योगदान होते.
अशात रविवारी (दि. 25 जून) पंड्या बंधूंच्या वडिलांचा वाढदिवस होता. या खास क्षणी कृणाल पंड्या (Krunal Pandya) याने वडिलांना खूपच मिस केले. वडिलांच्या वाढदिवशी कृणालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
खरं तर, हिमांशू पंड्या (Himanshu Pandya) यांचे जानेवारी 2021मध्ये निधन झाले होते. दोघे भाऊ त्यांच्या वडिलांच्या खूपच जवळ होते. तिघांचे नाते मित्रांसारखे होते. वडिलांच्या निधनानंतर हार्दिक आणि कृणाल खूपच भावूक झाले होते. अशात त्यांच्या जन्मदिनी कृणालने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिघेही घरात एकत्र क्रिकेट खेळताना दिसत आहेत. व्हिडिओत हार्दिक त्याच्या वडिलांना चेंडू टाकताना दिसत आहे.
कृणाल पंड्याने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज आपल्या खास व्यक्तीची जरा जास्तच आठवण येत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.”
https://www.instagram.com/reel/Ct6cQL_L9_e/?utm_source=ig_embed&ig_rid=825251f8-bb20-44b9-b680-5fab776924e2
कृणालविषयी बोलायचं झालं, तर तो आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामानंतर आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा संघाकडून खेळताना दिसू शकतो. त्यासाठी त्याने तयारीही सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नी पंखुडी शर्मा हिच्यासोबत जिममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओही इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तसेच, त्याचा लहान भाऊ हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे संघात निवडला गेला आहे. तसेच, त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. (indian all rounder krunal pandya got emotional shared old video on his fathers birthday)
महत्वाच्या बातम्या-
‘तुझ्याकडे पैसा जास्त आणि माझ्याकडे…’, ब्रावोने पोलार्डला पुन्हा केले ट्रोल, पाहा व्हिडिओ
भारतीय संघ कसा संपवणार 10 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा वनवास? विंडीजच्या दिग्गजाने सांगितला अनोखा फॉर्म्युला