---Advertisement---

‘फुल टू फिल्मी’ पद्धतीने राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ क्रिकेटरचा झाला साखरपुडा, फोटो तुफान व्हायरल

---Advertisement---

भारताचा अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपाल हा लवकरच त्याच्या प्रेयसीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या होणाऱ्या जीवनसंगिनीचे नाव निकीता असे आहे. गुरुवारी (12 ऑगस्ट) त्याचा निकितासोबत साखरपुडा झाला आहे. गोपालच्या इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी, राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियाद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी या जोडप्याचा फोटो पोस्ट करत त्यांचे अभिनंदनही केले आहे.

साखरपुड्यातील गोपाल आणि होणारी पत्नी निकिताचा हा फोटो आहे. या फोटोत दोघांनीही आधुनिक पद्धतीने साखरपुडा केला असल्याचे दिसत आहे. अगदी सिनेमातील दृश्यांप्रमाणे सजावट करुन त्याने निकीतासोबत साखरपुडा केल्याचे दिसत आहे. राजस्थान संघाने ट्विटर अकाउंटवर त्यांचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, ‘ती श्रे-येस्स म्हणाली! अभिनंदन, श्रेयस गोपाल आणि निकिता.’

गोपाल शेवटच्या वेळी आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात दिसला होता. मात्र आयपीएलचा पहिला टप्पा बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने फ्रँचायझींसाठी तयार केलेल्या जैव-सुरक्षित वातावरणामध्ये कोविड-19 प्रकरणे आढळून आल्यानंतर अर्ध्यातच स्थगित करण्यात आला होता. यादरम्यान गोपालने केवळ 2 सामने खेळले होते. यात या अष्टपैलू खेळाडूने अवघ्या 7 धावांचे योगदान दिले होते.

गोपालच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने एकूण 47 सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने 48 विकेट्स चटकावल्या आहेत. यात 16 धावांवर 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. तर फलंदाजीत त्याने 171 धावा केल्या आहेत. गोपाल 2014 पासून आयपीएलचा भाग आहे. राजस्थान संघाव्यतिरिक्त को मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. मात्र गेल्या 7 वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळत असलेला गोपाल अजून भारतीय संघात जागा मिळवू शकलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुझं टॅलेंट वाया घालवू नकोस, कोहलीकडून जरा शिक,’ पीटरसनने इंग्लंडच्या खेळाडूची घेतली शाळा

‘इंग्लंड संघाला सराव देताय का?’ सतत फ्लॉप ठरत असलेल्या रहाणे, पुजाराला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ब्रॉडचे तुटले हृदय, केली भावनिक पोस्ट शेअर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---