आयपीएलच्या 13 व्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून युएई येथे सुरुवात झाली आहे. ही लीग युवा खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. अनेक युवा खेळाडू इथे उत्कृष्ट कामगिरी करतात. भारताकडून 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक संघात खेळलेला शुबमन गिल हा त्यापैकीच एक आहे. त्याने या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावले होते. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिसने त्याचे कौतुक केले आहे.
तो म्हणाला, “केकेआर संघाचा शुबमन गिल एक महान फलंदाज म्हणून ओळखला जाईल. केकेआरचा माजी सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा हा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे आणि अनुभवी फलंदाज गौतम गंभीर आयपीएलमध्ये खेळणार नाही. अशा परिस्थितीत गिलवर केकेआर संघाची अधिक जबाबदारी असेल. संघाला यश मिळवून देण्यात त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. तो चांगली कामगिरी करेल.”
18 महिन्यांपासून आहे अव्वल क्रमांकाचा चिअर लीडर
पुढे बोलताना स्टायरिसने सांगितले, “गेल्या 18 महिन्यांपासून मी अव्वल क्रमांकाचा चिअर लीडर आहे. आता मी शुबमच्या फॅनबॉयच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने मी प्रभावित झालो आहे. केकेआर संघात फेरबदल झाल्यानंतर मुंबई आणि दिल्ली या दोन संघात चांगला संघर्ष होऊ शकेल. केकेआर संघ अधिक मजबूतीने मैदानात उतरण्यास तैयार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-२ मोठे विक्रम केले पण ‘या’ गोष्टीमुळे मोठ्या विक्रमापासून रोहित शर्मा राहिला दूर
-एका मराठी चाहत्याला आपलं शेवटचं ट्विट करत या महान क्रिकेटपटूने जगातून घेतली एक्झिट
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज
-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज
-श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….