भारताच्या महिला क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाज स्मृती मंधाना मागच्या काही महिन्यांपासून उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. पुढच्या वर्षी महिला विश्वचषक खेळला जाणार आहे. त्यापूर्वी स्मृती स्वतःच्या खेळीत अधिक सातत्य आणू इच्छित आहे. यावर्षी कोरोना महामारीदरम्यान दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या मायदेशातील मालिकेत स्मृतीने अपेक्षित प्रदर्शन केले नव्हते. मात्र, त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिने चांगले प्रदर्शन करून दाखवले होते आणि चांगल्या फॉर्ममध्ये पुनरागमन केले होते.
स्मृती भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळते आणि तिला महिला संघाची भविष्यातील कर्णधार देखील मानले जाते. ती म्हणाली की, “कोविड १९ नंतर लय मिळवणे कठीण होते. कारण मी दिड वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होते. फॉर्ममध्ये येण्यासाठी थोडा वेळ लागला. मात्र, मागच्या दोन मालिका चांगल्या राहिल्या. परंतु सुधारणेला निश्चितच वाव आहे.” ती म्हणाली, “मी माझ्या टायमिंगमुळे खूश आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, संघाने देखील मागच्या एक वर्षात खूप काही शिकले आहे, ज्याची मदत आम्हाला पुढे जाण्यासाठी मिळेल.”
महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये देखील स्मृतीचे प्रदर्शन उत्तम होते. यामध्ये तीने एक शतक देखील केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळलेल्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात देखील तिने दमदार शतकी खेळी केली होती. त्याशिवाय मर्यादित शटकांच्या क्रिकेटमध्ये तिने दोन हीअर्धशतके ठोकली होती. मागच्या काही महिन्यांमध्ये तिने एकापाठोपाठ मालिका खेळल्या आहेत. आता तिला आगामी काळात न्यूझीलंडमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या विश्वचषकात चांगले प्रदर्शन करायचे आहे.
ती पुढे बोलताना म्हणाली, “कोविड १९ नंतर मला फॉर्ममध्ये येण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. सलग सामने खेळणे कठीण होते. पण आम्ही मागच्या सहा महिन्यांमध्ये खूप क्रिकेट खेळले आहे आणि हे चांगले संकेत आहेत. शरीरही पुढच्या स्पर्धेसाठी तयार वाटत आहे. फलंदाजाच्या रूपात तुम्हाला सातत्य आणण्यासाठी थोडे स्वार्थी बनावे लागते आणि मला यावरच काम करायचे आहे. अटीतटीच्या सामन्यांमध्ये नियमितपणे शेवट करायचा आहे. आम्हाला सर्वांना माहिती आहे की, आम्हाला यावर काम करायचे आहे, कारण यामुळे आम्हाला विश्वचषकात खूप मदत मिळेल.”
महत्वाच्या बातम्या –
ऍशेसच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा १२ सदस्यीय संघ घोषित; दिग्गज दुकलीचे पुनरागमन
मोठ्या मनाचा नटराजन; स्वतःच्या गावकऱ्यांसाठी बनवतोय दर्जेदार क्रिकेट मैदान
ऍशेसच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा १२ सदस्यीय संघ घोषित; दिग्गज दुकलीचे पुनरागमन