---Advertisement---

इशांत शर्माला कपील-भज्जीचा मोठा विक्रम मोडण्याची संधी

On: सोमवार, ऑगस्ट 20, 2018 2:52 PM
---Advertisement---

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे २९२ धावांची मोठी आघाडी आहे.

इंग्लंडचा पहिला डाव १६१ धावांतच कोलमडला. यामुळे भारताने पहिल्या डावात १६८ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाखेर २ बाद १२४ धावा केल्या.

या मालिकेत इशांत शर्माने ३ सामन्यातील ५ डावात ९ विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी दोन डावात त्याने अॅलस्टर कूकला बाद केले आहे.

कारकिर्दीत तब्बल १०वेळा इशांत शर्माने या खेळाडूला तंबुत पाठवले आहेत. यापुर्वी एखाद्या ठराविक फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा पराक्रम भारतीय खेळाडूंमध्ये कपिल देव आणि हरभजन सिंगच्या नावावर आहे.

कपिल देव यांनी मुदसर नजर(१२), ग्रॅम गुच (११), डेविड गोव्हर (१०), अॅलन बाॅर्डर (१०) आणि माल्कम मार्शल (१०) यांना कसोटी कारकिर्दीत १० पेक्षा जास्तवेळा बाद केले होते तर हरभजन सिंगने रिकी पाॅटिंगला १०वेळा बाद केले आहे.

जर या मालिकेत इशांत राहिलेल्या ५ डावात अॅलस्टर कूकला दोनवेळाही बाद करु शकला तर तो कपिल देव यांच्या या मोठ्या पराक्रमाची बरोबरी करेल.

इशांत शर्मापेक्षा जास्तवेळा केवळ माॅर्ने माॅर्केलने अॅलस्टर कूकला बाद केले आहे. त्याने हा कारनामा १२ वेळा केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-…तरच टीम इंडिया घडविणार तिसऱ्या कसोटीत इतिहास

-भारतीय महिला कबड्डी संघाचा दुसरा विजय, जाणून घ्या महिला कबड्डीचे दुसऱ्या दिवसाचे सर्व निकाल

एशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment