---Advertisement---

भारताच्या निखत झरीनला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

On: गुरूवार, मे 19, 2022 9:51 PM
nikhat-zareen
---Advertisement---

भारताची आघाडीची बॉक्सिंगपटू निखत झरीन ( Nikhat Zareen ) हिने जागिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. थायलंडच्या जितपाँग जुतामासा हिला पराभूत करत निखतने सुवर्णपदक तिच्या नावावर केले आहे. ५२ किलो वजनी गटात निखत झरीनने हे सुवर्णपदक मिळवले आहे. भारताची प्रसिद्ध बॉक्सिंगपटू मेरी कोम हिच्यानंतर हा किताब मिळवणारी निखत ही दुसरी भारतीय महिला ठरली आहे. ( Nikhat Zareen Becomes World Champion )

निखत झरीनने थायलंडच्या जितपाँग जुतामासा हिचा ५-० अशा फरकाने पराभव केला.

 

निखत जरीनने (Nikhat Zareen) तुर्कीतील इस्तंबुल (Istanbul) या शहरात सुरु असलेल्या आयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (Women’s Boxing Championship) निखतने ५२ किलो वजनी गटात ही सुवर्ण कामगिरी केली. अंतिम फेरीत दाखल होण्यापूर्वी तीने उपांत्य फेरीत ब्राझीलच्या कॅरोलिन डी आल्मेडाला पराभूत केले होते. त्यानंतर आता थायलंडच्या जितपाँग जुतामासा हिला ५-० ने मात देत निखतने स्वतःचे निर्विवाद वर्चस्व दाखवून दिले.

( Indian Boxer Nikhat Zareen Becomes World Champion )

अधिक वाचा

ब्रेकिंग.! भारताच्या निखत झरीनला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

हेल्मेट फेकलं, बॅट आपटली; अंपायरच्या निर्णयावर नाखुश मॅथ्यू वेडची ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---