बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये शनिवारी (०६ ऑगस्ट) बॉक्सिंग रिंगमध्ये भारताच्या बॉक्सर्सचा जलवा पाहायला मिळू शकतो. कॉमनवेल्थमधील आपले पदक पक्के करण्यासाठी ७ पैकी ६ भारतीय बॉक्सर आपापल्या उपांत्य फेरी सामन्यात ऍक्शनमध्ये दिसतील. महिलांमध्ये बॉक्सर नीतू घंघास, निखत झरीन, जॅस्मिन आपला दम दाखवताना दिसतील. तर पुरुषांमध्ये बॉक्सर अमित पंघाल, रोहित टोकस आणि सागर नायझेरिया आपली दावेदारी ठोकतील. या सर्व भारतीय बॉक्सर्सनी उपांत्य सामन्यात पोहोचत कांस्य पदक पक्के केले आहेत. आता जर त्यांनी उपांत्य सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे रौप्य पदकही निश्चित होईल.
उपांत्य सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंबद्दल अधिक माहिती घेऊया…
नीतू घंघास- उपांत्य सामन्यात महिलांच्या ४८ किलो गटातून नीतूचा सामना कॅनडाच्या प्रियंका ढिल्लो हिच्याशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू झाला आहे.
अमित पंघाल- पुरुषांच्या ५१ किलो गटात अमितचा सामना जांबियाच्या पॅट्रिक चिन्येम्बा याच्याबरोबर होईल. हा उपांत्य सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.
निखत झरीन- महिलांच्या ५० किलो गटातून निखत झरीन ऍक्शनमध्ये असेल. ती उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या सवाना स्टबलीशी दोन हात करेल. त्यांच्यातील सामना संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल.
जॅस्मिन- महिलांच्या ६० किलो गटातून जॅस्मिनची भिडंत इंग्लंडच्या जेम्मा रिचर्डसनशी होईल. हा उपांत्य सामना रात्री ८ वाजता खेळला जाईल.
रोहित टोकस- पुरुषांच्या ६७ किलो गटातून रोहित झाम्बियाच्या स्टीफन जिम्बासोबत भिडेल. हा उपांत्य सामना रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होईल.
सागर नायझेरिया- पुरुषांच्या ९२ किलो गटातून सागर नायझेरिया इफेनी ओन्येकवेरेशी भिडेल. त्यांचा उपांत्य सामना रात्री उशीरा दीड वाजता सुरू होईल.
कोठे पाहता येतील हे सर्व सामने
हे सर्व सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनलवर पाहता येईल. डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्यांचे टेलिकास्ट केले जाईल. सोनी लिव्ह ऍपवरही या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकवून देणारे कर्णधार आता आहेत तरी कुठे? एक तर झालायं निवृत्त
भारताची गोल्ड मेडलवर नजर! नाणेफेक जिंकत हरमनप्रीतने घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग ११