भारताला न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या वन-डे सामन्यात 8 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. हा सामना भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मासाठी खास होता.
हा रोहितचा 200वा वन-डे सामना होता. मात्र यामध्ये त्याची चांगलीच निराशा झाली. तो या सामन्यात केवळ 7 धावा करून बाद झाला होता.
रोहितने आत्तापर्यंत वन-डेमध्ये 3 द्विशतकी खेळी केल्या आहेत. त्यातील शेवटचे द्विशतक त्याने आधीच्या सामन्यात संघ पराभूत झाल्यानंतर त्याच्या पुढील सामन्यात केले आहे.
10डिसेंबर, 2012मध्ये धरमशाला मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंके विरुद्ध सर्वबाद 112 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 7 विकेट्सने गमावला होता. योगायोग म्हणजे या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहितकडे होते. यामध्ये त्याने 2 धावा केल्या होत्या.
यानंतर 13 डिसेंबर, 2012ला झालेल्या सामन्यात रोहितने तिसरे द्विशतक करताना 208 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 141 धावांनी जिंकला होता.
न्यूझीलंड विरुद्ध होणारा भारताचा सामना वेलिंग्टन येथे होणार आहे. येथे भारताने 3 वन-डे सामने खेळले असून भारताने त्यातील 1 सामना जिंकला तर 1 सामना गमवावा लागला आहे. एका सामन्याचा निकालच लागला नाही.
भारताने आधीच न्यूझीलंडमध्ये 5 सामन्यांची वन-डे मालिका नियमित कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 3-0ने जिंकला आहे. मात्र पाचवा सामना जिंकून भारत या मालिकेचा शेवट चांगला करण्याचा प्रयत्न करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–२०१९च्या विश्वचषकाआधी टीम इंडिया या संघाविरुद्ध खेळणार सराव सामने
–ठरले! २०२३च्या विश्वचषकाचे यजमानपद असणार या देशाकडे…
–तिसऱ्या वनडेत मिताली राजने रचला इतिहास, असा कारनामा करणारी बनली पहिलीच महिला क्रिकेटपटू