आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) आज (11 सप्टेंबर) रोजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. भारतीय संघाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत मुसंडी मारली आहे. रोहितने कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला. तर दिग्गज फलंदाज कोहलीची एका स्थानाने कसोटी क्रमवारीत प्रगती झाली आहे. युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालनेही कसोटी क्रमवारीत प्रगती केली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 3 वर्षांनंतर कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये आला आहे. रोहितला फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असून तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. सप्टेंबर 2021 नंतर प्रथमच रोहित आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये पोहोचला आहे.
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनेही (Virat Kohli) कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत प्रगती केली. कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला असून तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. शिवाय युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाललाही (Yashasvi Jaiswal) एका स्थानाचा फायदा झाला असून तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत टाॅप-10 फलंदाज-
1) जो रूट (इंग्लंड) – 899 गुण
2) केन विल्यमसन (न्यूझीलंड) – 859 गुण
3) डॅरिल मिशेल (न्यूझीलंड) – 768 गुण
4) स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – 757 गुण
5) रोहित शर्मा (भारत) – 751 गुण
6) यशस्वी जयस्वाल (भारत) – 740 गुण
7) विराट कोहली (भारत) – 737 गुण
8) उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया) – 728 गुण
9) मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) – 720 गुण
10) मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया) – 720 गुण
महत्त्वाच्या बातम्या-
“आम्ही पाकिस्तानला पुन्हा एकदा हरवू शकतो”, अमेरिकेच्या गोलंदाजाने व्यक्त केला विश्वास
IND vs BAN: कडेकोट बंदोबस्तात खेळवली जाणार कानपूर कसोटी, खेळाडूंसाठीही विशेष सुरक्षा व्यवस्था
बांग्लादेश टी20 मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या ॲक्शनमध्ये; Photos