भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि महान फलंदाज विराट कोहली हे 2022 च्या टी20 विश्वचषकापासून एकही टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळले नाहीत. पुढीच्या वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे संयुक्त टी20 विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. यात रोहितला आणि विराटला हा विश्वचषक खेळता येणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रोहित शर्मा 36 वर्षांचा झाला आहे. तो बऱ्याच दिवसांपासून टी20 संघाबाहेर आहे. दरम्यान त्याने त्यांनी अमेरिकेत स्वतःची एक अकादमी उघडली आहे. अकादमीच्या उद्घाटनावेळी त्याने पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबाबत रोहितने मोठी गोष्ट सांगितली आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) ने कॅलिफोर्नियातील अकादमीच्या उद्घाटनावेळी सांगितले की, “2024 टी20 विश्वचषक अमेरिकेत होणार आहे. त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक आहे.” अशा प्रकारचे विधान करुन त्याने 2024 टी20 विश्वचषकाच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले आहे. तसेच यंदा भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकाबाबत तो म्हणाले की, “स्पर्धेतील सर्व संघ चांगले आहेत. आमचे खेळाडूही चांगल्या स्थितीत असून आमच्याकडे विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे.” असे रोहितने सांगितले. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच पसरत आहे.
Captain Rohit Sharma talking about on World Cup 2023.
The Hitman of World Cricket. pic.twitter.com/qOD3u7LgPY
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 6, 2023
आशिया चषकला 30 ऑगस्टपासून सुरवात
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर रोहित सध्या सुट्टीवर आहे. तो आणि विराट कोहली (Virat kohali) शेवटच्या 2 वनडे सामन्यात खेळले नव्हते. हे दोन्ही दिग्गज भारतीय क्रिकेटपटू 30 ऑगस्टपासून होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भाग घेतील. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 2 सप्टेंबरला भिडणार आहेत. याआधी, 24 ऑगस्टपासून बेंगळुरूमध्ये संघाचे शिबिर आयोजित केले जाईल. आशिया चषकासाठी संघाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते.
भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंची विश्वचषकावर नजर
अनेक भारतीय खेळाडूंसाठी यंदा भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकातील कामगिरी महत्त्वाची असणार आहे. भारतीय संघाने जर हा विश्वचषक जिंकला तर रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंतचे खेळाडू आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द आजून पुढे नेऊ शकतील. त्याचबरोबर प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळही विश्वचषकानंतर संपत आहे. (indian captain rohit sharma talk about t20 world cup 2024 )
महत्वाच्या बातम्या-
विराट आणि रोहितमध्ये सर्वोत्तम कोण? विंडीजच्या स्टार खेळाडूने क्षणाचाही विलंब न करता सांगितले उत्तर
जगातील सर्वोत्तम कर्णधार कोण? पाकिस्तानी खेळाडूने बाबर अन् इम्रान नाही, तर ‘या’ भारतीयाचे घेतले नाव