भारतीय संघ वनडे मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेला पोहोचला आहे. १८ ऑगस्टपासून भारत विरुद्ध झिम्बाब्वे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेत भारताचा संघ आधी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणार होता, मात्र गुरूवारी (११ ऑगस्ट) बीसीसीआयने धक्का देत या मालिकेसाठी केएल राहुलला कर्णधार घोषित केले आहे. यामुळे भारतीय संघात सध्या कर्णधारपदाची एकप्रकारे म्यूजिकल चेयर ही गेम चसुरू आहे. प्रत्येक मालिकेसाठी वेगळा कर्णधार असे दृष्य आपल्याला दिसत आहे.
२०२२मध्ये भारताच्या कर्णधाराची मोठी यादी
विराट कोहली (Virat Kohli) हा २०२१च्या टी२० विश्वचषकापर्यंत भारताचा तिन्ही प्रकाराचा कर्णधार होता. त्याने विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडले. तर बीसीसीआयने त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले गेले. त्यानंतर भारतीय संघामध्ये कर्णधारांची अदला-बदल सुरू झाली ती आजपर्यंत थांबली नाही. त्याच्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद मिळाले. तर कोहली कसोटीचा कर्णधार राहिला. तसेच कसोटीच्या उपकर्णधार पदावरून अजिंक्य रहाणे याला हटवून रोहितला नियुक्त केले होते. त्यादरम्यान रोहित दुखापतग्रस्त झाला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट आणि केएल राहुल यांनी नेतृत्व केले होते. त्यानंतर विराटने कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडले. त्यानंतर रोहितच क्रिकेटच्या तिन्ही प्रकाराचा कर्णधार झाला.
राहुल दुखापतग्रस्त झाल्याने अडचण झाली
भारताच्या कर्णधारामध्ये एवढा बदल का होत आहे? याचे कारण राहुल ठरत आहे. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेच्याविरुद्ध टी२० मालिकेसाठी रोहितबरोबर अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्या मालिकेत राहुल कर्णधार होता, मात्र तो दुखापतग्रस्त झाल्याने रिषभ पंत (Rishabh Pant) याने संघाचे नेतृत्व केले होते. तर आयर्लंडच्या दौऱ्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला कर्णधारपद मिळाले. कारण त्यावेळी भारताचा एक संघ मुख्य खेळाडूंसह इंग्लंडच्या दौऱ्यावर होता.
रोहित शर्मा झाला कोरोनाग्रस्त
इंग्लंड दौऱ्याच्या सराव सामन्यात रोहितला कोरोना झाला. राहुल हा आधीच जखमी असल्याने संघाबाहेर होता. अशात जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. नंतर वनडे आणि टी२० मालिकांसाठी रोहित संघात परतला. वनडे आणि टी२० मालिका जिंकल्यानंतर भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला. त्या दौऱ्यात खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचा कर्णधार होता. परत टी२० मालिकेत रोहितने संघाचे नेतृत्व केले. तर त्याच मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहितला वगळत हार्दिकला कर्णधार केले.
भारताने या बाबतीत केली श्रीलंकेवर बरोबरी
भारताने एका वर्षात ७ खेळाडूंना कर्णधार केले. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक कर्णधार कोणत्या संघाने बदलले असतील तर श्रीलंका. मात्र याबाबतीत भारताने श्रीलंकेची बरोबरी केली आहे. २०१७मध्ये श्रीलंकेने ७ जणांना कर्णधारपद दिले होते. तसेच भारतीय संघात आता राहुल फिट झाल्याने रोहित नसला तर तो संघाचे नेतृत्व करेल. अशातच भारत श्रीलंकेचा विक्रम मोडणार का की नाही?
२०२२मध्ये भारताचे कर्णधार
विराट कोहली (कसोटी)
केएल राहुल (कसोटी, वनडे)
रोहित शर्मा (कसोटी, वनडे, टी२०)
रिषभ पंत (टी२०)
हार्दिक पांड्या (टी२०)
जसप्रीत बुमराह (कसोटी)
शिखर धवन (वनडे)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारने चहलच्या बायकोसोबत शेअर केला फोटो, कॅप्शन लिहीत ‘युझी’ला केलं ट्रोल
आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या ‘या’ तिकडीपासून टीम इंडियाला धोका
कॉमनवेल्थ गेम्समधील विजेत्यांना भेटले पंतप्रधान; म्हणाले, ‘देश तुमच्यासाठी रात्र-रात्र जागलाय’






