---Advertisement---

विराट-अनुष्काच्या ‘या’ आलिशान फ्लॅटची किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क

On: रविवार, ऑक्टोबर 11, 2020 12:18 PM
---Advertisement---

दिग्गज क्रिकेटपटू व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी सर्वांनाच आवडते. दोघेही आपापल्या क्षेत्रात खूप लोकप्रिय आहेत. लोकांना त्यांचे काम आवडते. चाहत्यांना बर्‍याचदा त्यांच्या आवडत्या व्यक्तीविषयी माहिती जाणून घ्यायला आवडते. आम्ही या लेखात विराट आणि अनुष्का याच्या राहत्या घराविषयी काही माहिती देणार आहोत.

11 डिसेंबर 2017 रोजी विराट-अनुष्का विवाहबंधनात अडकले होते. अनुष्का शर्माने वयाच्या 29 व्या वर्षी विराट कोहलीशी लग्न केले. फिल्म इंडस्ट्रीमधील मोठमोठ्या अभिनेत्यांनी त्यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.

या दोघांचे लग्न भारतात नव्हे तर इटलीमध्ये झाले होते. भारतात परतल्यानंतर या जोडप्याने एक भव्य पार्टी आयोजित केली. त्यानंतर हे जोडपं मुंबईत स्थायिक झाले.

विराट आणि अनुष्का हे मूळचे मुंबईचे नसून ते बहुतांश वेळ मुंबईत घालवतात. त्यामुळे या जोडप्याने तब्बल 35 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. ओंकार बिल्डिंगच्या 35 व्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे.

https://www.instagram.com/p/CBX6Bg5pSBy/?utm_source=ig_web_copy_link

हा फ्लॅट वरळी येथे आहे. त्यांच्या फ्लॅटमधून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. फ्लॅटमध्ये चार खोल्या आहेत. यापैकी एक खोली विराटच्या वर्कआउटसाठी आहे जी आपण लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियावर पहिली आहे. त्यांचा फ्लॅट खरोखरच पाहण्यासारखा आहे. या दोघांशिवाय या फ्लॅटमध्ये दुसरे कोणी राहत नाही. पण लवकरच त्यांच्या घरात एक बाळ येणार आहे.

चित्रपटात दाखविलेल्या रोमँटिक कथेप्रमाणे विराट कोहली आणि अनुष्का शर्माचीही कथा आहे. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, अशाच प्रकारे अनुष्कानेही 2017 मध्ये विराटचा हात धरला. त्यांची गणना सर्वोत्कृष्ट जोड्यांमध्ये केली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---