जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून भारतीय संघाच्या झालेल्या पराभवानंतर आता विराट कोहली आणि कंपनी सुट्टीवर गेली आहे. त्यांना 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही कसोटी मालिका सुरु होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी असून भारतीय संघाला तीन आठवड्यांचा ब्रेक दिला आहे. याच दरम्यान भारतीय संघातील सर्वच खेळाडू सुट्टीच्या दिवसांचा आनंद घेताना दिसून येत आहेत. परंतु दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कसोटी मालिकेसाठी सराव करताना दिसून आला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराट जिथे असेल तिथे नित्य नियमाने व्यायाम आणि सराव करत असतो. मंगळवारी विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर वेट लिफ्टिंग बार (डंबल्स) वापरुन कसरत करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
विराटचा व्हिडिओ झाला व्हायरल
विराट कोहली सध्या युनायटेड किंगडममध्ये आहे. भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज होत आहे. विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडियावर आपले 2 व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दाखविले की, तो कशाप्रकारे विजयाची तयारी करत आहेत.
पहिल्या व्हिडिओमध्ये विराटने बेंट-ओवर रोचा सराव करताना दिसून आला. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये विराट रिव्हर्स बारबेल लंग्सने सराव करताना दिसून येतो आहे. विराटने व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि 12 तासांमध्ये 24 लाखपेक्षाही जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले होते. विराटचा हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आणि काही लोकांनी कमेंटमध्ये लिहिले की, ‘आम्हीदेखील जिम सुरू करू.’
https://www.instagram.com/p/CQ_OH7vN3yl/?utm_source=ig_web_button_share_sheet
भारतीय संघ आहे सध्या सुट्टीवर
जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला तीन आठवड्यांचा ब्रेक दिलेला आहे. त्यानंतर 15 जुलैपासून सर्व खेळाडूंना डरहममध्ये पुन्हा एकदा एकत्र यायचे आहे. जिथे भारतीय संघ कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर सराव सामना खेळणार आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये 4 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान नॉटिंघममध्ये होणार आहे. दुसरा कसोटी सामना 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्टदरम्यान लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्टदरम्यान लॉर्ड्स मैदानावरच होणार आहे आणि चौथा कसोटी सामना 2 सप्टेंबरपासून 6 सप्टेंबरपर्यंत लंडनच्या द ओव्हल मैदानावर होणार आहे. तर या मालिकेचा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 10 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेहून आली आनंदाची बातमी, हार्दिक पंड्या ‘बहुप्रतिक्षित’ भूमिकेत मैदानावर उतरणार
सुरेख भेट! जाळ अन् धूर संगठच काढत चाहत्याने धोनीसाठी बनवले अतिसुंदर गिफ्ट; एकदा पाहाच
रोहित अन् ‘हा’ फलंदाज करणार ओपनिंग, शॉला इंग्लंडला पाठवण्याची मागणी निवडकर्त्यांनी फेटाळली!