---Advertisement---

‘कॅप्टनकूल’ धोनीच्याच समोर कर्णधार कोहलीने केली त्याच्या खास विक्रमाची बरोबरी

On: मंगळवार, ऑक्टोबर 22, 2019 12:39 PM
---Advertisement---

रांची। जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे आज(22 ऑक्टोबर) भारताने दक्षिण आफ्रिके विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने 3 सामन्यांची कसोटी मालिका 3-0 अशा फरकाने जिंकत दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश दिला आहे.

या सामन्यातील विजयामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक खास विक्रमही नोंदवला गेला आहे. विराटने कसोटीमध्ये एका डावाने सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

विराटचा कर्णधार म्हणून हा कसोटीमध्ये एका डावाने विजय मिळवलेला 9 वा सामना आहे. धोनीनेही 9 कसोटी सामने कर्णधार म्हणून एका डावाने जिंकले आहेत.

विशेष म्हणजे आज या सामन्यादरम्यान धोनी स्टेडीयममध्ये सामना पाहण्यासाठी उपस्थित होता.

विराटने हा कारनामा करताना भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले आहे. अझरुद्दीन यांनी 8 वेळा कर्णधार म्हणून कसोटीमध्ये एका डावाने विजय मिळवले आहेत.

सर्वाधिक कसोटी सामन्यात एका डावाने विजय मिळवणारे भारतीय कर्णधार – 

9 – एमएस धोनी

9 – विराट कोहली

8 – मोहम्मद अझरुद्दीन

7 – सौरव गांगुली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---