भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी (७ मे) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी २० जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघ निवडकर्त्यांनी मागील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार प्रदर्शन करणाऱ्या अधिकतर खेळाडूंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
परंतु सध्या फॉर्ममध्ये असलेल्या आणि आयपीएल २०२१ खोऱ्याने धावा काढणाऱ्या पृथ्वी शॉला निवडकर्त्यांनी दुर्क्षलित केले आहे. अशात भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी पृथ्वीला भारतीय संघात जागा न मिळण्यामागचे कारण सांगितले आहे.
पृथ्वीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. त्याने या हंगामात ८०० हून अधिक धावा कुटल्या होत्या. हाच फॉर्म कायम राखत तो आयपीएल २०२१ मध्ये झळकला होता. दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्त्व करताना अवघ्या ८ सामन्यात त्याने ३०८ धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ८२ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली आहे.
त्याचा हा उल्लेखनीय फॉर्म पाहता त्याला भारतीय कसोटी संघात जागा मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु संघ निवडकर्त्यांनी त्याची निवड केली नाही.
याबद्दल आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे भोगले यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘आठवण करा. यावर्षी रणजी ट्रॉफीचा हंगाम झालेला नाही. त्यामुळे संघ निवडकर्त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या प्रदर्शनाला लक्षात घेत संघाची निवड केली आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी ते सर्व केले, ज्याची संघाला त्यांच्याकडून अपेक्षा होती. मार्च २०२० पासून पृथ्वी शॉला लाल चेंडूने क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळे पृथ्वीला त्याचा फॉर्म दाखवण्याची संधी मिळाली नाही.’
Remember, no Ranji Trophy this year so the selectors have had to go with what they saw in Australia and against England. Washington Sundar and Thakur did all that was asked of them. And Shaw hasn't had the chance to show his red ball form. Been no red ball game since March 2020
— Harsha Bhogle (@bhogleharsha) May 7, 2021
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).
Standby players: Abhimanyu Easwaran, Prasidh Krishna, Avesh Khan, Arzan Nagwaswalla
Details ???? https://t.co/AZhTboIYOR
— BCCI (@BCCI) May 7, 2021
भारताचा इंग्लंड दौरा
१८ ते २२ जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा






