आयसीसी वनडे विश्वचषक 2023 यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. भारतीय संघही यासाठी तयारी करत आहे. दरम्यान, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला त्यांच्या फलंदाजीच्या क्रमवारीत तीन डावखुरे फलंदाज ठेवण्याची सल्ला दिला आहे. शास्त्रींच्या सल्ल्यावर भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, “विश्वचषकात भारताला त्यांच्या फलंदाजी क्रमात तीन डावखुऱ्या फलंदाजांची गरज असेल. अशा परिस्थितीत त्यांनी यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा आणि रवींद्र जडेजा यांना टॉप-7 ठेवावे.” त्यांच्या या सल्यावर प्रतिक्रिया देत ही अन्यायकारक मागणी असल्याचे रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याचे मत आहे.
अश्विन त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, “शास्त्री म्हणतात भारतीय संघात वरच्या 7 फलंदाजांमध्ये किमान 3 डावखुरे फलंदाज ठेवा. वरच्या 7 फलंदाजांमध्ये तीन डावखुरे फलंदाज होणार कसे? संघाबद्दल बोलायचे झाले तर हार्दिकची जागा संघात निश्चित आहे, जडेजाची जागा निश्चित आहे. अशात संघाकडे एक डावखुरा फलंदाज आहे.”
पुढे अश्विन म्हणाला की, “रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली टॉप-3 मध्ये निश्चित आहेत. आमच्याकडे डावखुरा फलंदाज नाही. जर केएल राहुल तंदुरुस्त असेल तर तो यष्टिरक्षक फलंदाज होईल हे निश्चित आहे. जर श्रेयस तंदुरुस्त असेल तर तोही संघात आपली जागा बनवू शकतो.” असेही अश्विन म्हणाला.
विश्वचषकापूर्वी भारत योग्य संघ निवडण्यात गुंतला आहे. भारतीय संघाचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यापैकी काही जण स्वत:ला फिट करण्याच्या शर्यतीत धावत आहेत. त्यापैकी सर्वाधिक नजर केएल राहुल आणि श्रेयार अय्यर यांच्यावर आहे. या दोघांनी जर आपला फिटनेस चांगला केला तर भारतीय संघात या दोघांची जागा जवळपास निश्चित होण्याची शक्यता आहे. (indian cricket bowler ravichandran ashwin question coach ravi shastris suggestion playing 3 left handers in top 7 worldcup 2023)
महत्वाच्या बातम्या-
‘जय शाहला पाहून कोण टाळ्या वाजवेल?’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूने साधला पीसीबीवर निशाणा
रॉयल लंडन कपमधून बाहेर पडल्यानंतर पृथ्वी शॉने दिला इतरांना दोष! इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत