वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत या विजयानंतर भारतीय संघ 0-1 अशा आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या यशस्वी जयसवाल याला सामनावीर पुरस्ताक दिला गेला. पण अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन देखील कुठेच कमी पडला नाही. अश्विनने या सामन्यात तब्बल 12 विकेट्स घेतल्या.
रविचंद्रन अश्विनची गणना भारतीय क्रिकेट संघाच्याच नाही, तर जगातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाजांमध्ये केली जाते. भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्यांमध्ये रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) शुक्रवारी (14 जुलै) दुसर्या क्रमांकावर पोहोचला. अश्विनने भारताचा माजी दिग्गज हरभजन सिंग याला मागे टाकत यादीत हे स्थान पटकावले. हरभजनच्या नावावर 707 आंतरराष्ट्रीय विके्स आहेत, तर अश्विनच्या नावावर आता 709 आंतरराष्ट्रीय विकेट्सची नोंद झाली आहे. यादीत पहिल्या स्थानी असलेल्या अनिल कुंबळेंनी आपल्या कारकिर्दीत एकूण 953 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.
मागच्या 17 वर्षांमध्ये अश्विन एकमवेल गोलंदाज आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यात भारतासाठी 12 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनव्यतिरिक्त एकही भारतीय गोलंदाज मागच्या 17 वर्षात कसोटी सामन्यात 12 विकेट्स घेऊ शकला नाहीये.
भारतासाठी कसोटी सामन्यात 12+ विकेट्स घेणारे गोलंदाज (मागच्या 17 वर्षांमध्ये)
अश्विन 12/85 विरुद्ध न्यूझीलंड, हैदराबाद 2012
अश्विन 12/198 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई 2013
अश्विन 12/98 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नागपूर 2015
अश्विन 13/140 विरुद्ध न्यूझीलंड, इंदौर 2016
अश्विन 12/167 विरुद्ध इंग्लंड, मुंबई 2016
अश्विन 12/131 विरुद्ध वेस्ट इंडीज, रोझो 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला तर वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडीजने पहिल्या डावात 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने आपला पहिला डावत 5 बाद 421 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडीज अवघ्या 130 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने विजय मिळवला. यशस्वी जयसवालने कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच डावात 171 धावांची वादळी खेळी केली आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. जयसवालला यासाठी सामनावीर पुरस्कार दिला गेला. (six times Ravichandran Ashwin took 12+ wickets in a Test in the last 17 years:)
महत्वाच्या बातम्या –
Asian Games 2023 । भारतीय संघाची घोषणा, ‘असे’ आहे हरमनप्रीतच्या नेतृत्वातील स्क्वॉड
भारतीय संघात निवड होताच रिंकूची मोठी प्रतिक्रिया, फक्त एकाच शब्दात झाला व्यक्त