---Advertisement---

Video: भारतीय खेळाडूंनी घेतले ‘डाल्गोना कँडी’ चॅलेंज, पाहा कोण झालं पास अन् कोण झालं फेल

On: गुरूवार, ऑक्टोबर 21, 2021 11:33 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी लोकप्रिय कोरियन मालिका ‘स्क्विड गेम’ मधून ‘डाल्गोना कँडी चॅलेंज’ घेतले आहे. नेटफ्लिक्सची ही मालिका सध्या सोशल मीडियावरील टॉप ट्रेंडपैकी एक आहे आणि भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी या शोचा ट्रेंड फॉलो केला आहे. या मालिकेच्या एका भागातील सहभागींना कँडी न तोडता त्यावर छोटी आकृती कोरावी लागते. जे असे करत नाहीत ते मारले जातात. भारतीय क्रिकेटपटूंनी घेतलेल्या या ‘डाल्गोना कँडी चॅलेंज’चा व्हिडिओ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

भारतीय खेळाडूंनी आता स्क्विड गेमचे हे ‘डाल्गोना कँडी चॅलेंज’ पूर्ण करण्याचे ठरवले आहे. भारतीय खेळाडूंचा हा व्हिडिओ शेअर करताना आयसीसीने सोशल मीडियावर लिहिले, ‘या धोकादायक खेळामध्ये भारतीय क्रिकेट संघ.’ आयसीसीने पुढे लिहिले की, ‘जगातील सर्वाधिक लोकप्रिय अशा मालिकेतील एका बहुचर्चित खेळात भारतीय क्रिकेटपटू चाचणी देत आहेत.’

भारतीय संघाकडून रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी हे आव्हान स्वीकारले होते. वरुण, राहुल, सूर्यकुमार आणि बुमराह हे आव्हान पार करताना अपयशी ठरतात कारण त्यांनी आकडे कोरण्याचा प्रयत्न करताना त्यांची कँडी तोडली होती. तर दुसरीकडे, रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे आव्हान यशस्वीपणे पार करतात, कारण ते संयमाने कँडीमधून आकार योग्यपणे कोरतात.

https://www.instagram.com/p/CVQQsiLlnNX/

भारताने बुधवारी (२० ऑक्टोबर) टी -२० विश्वचषकाच्या अंतिम सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. मात्र, सहाव्या गोलंदाजाचा प्रश्न हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. या सराव सामन्यात, विराट कोहलीने गोलंदाजीतही हात आजमावला आहे.

या सामन्यात विराट कोहली कर्णधार नव्हता. रोहित शर्माने त्याच्या जागी ही जबाबदारी घेतली होती. विराट कोहलीने फक्त क्षेत्ररक्षण केले आणि गोलंदाजी केली. त्याचबरोबर रोहित शर्माने ४१ चेंडूत ६० धावांची खेळी खेळली. केएल राहुलने ३१ चेंडूत ३९ धावा केल्या. भारताने १५२ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत पूर्ण केले.

भारतीय संघाने टी -२० विश्वचषकातील दोन्ही सराव सामने संघाने जिंकले आहेत. विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात, भारतीय संघ २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी सामना करेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानविरुद्ध इरफान पठाणने निवडली भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’; इशान किशन, आर अश्विनला दिला डच्चू

जवळचा मित्र विराटच्या सल्ल्याने मॅक्सेवलचा घात, धोकादायक अष्टपैलूला चाहरने ‘असे’ केले बाद

वनिंदू हसरंगाचे ११ चेंडू सीमापार करत तुफानी अर्धशतक; आयर्लंडला नमवत श्रीलंकेचा सुपर १२ मध्ये थाटात प्रवेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---