---Advertisement---

इतिहास घडणार, भारतीय खेळाडू देशाबाहेरील या लीगमध्ये खेळणार!

On: शुक्रवार, मे 25, 2018 10:15 PM
---Advertisement---

भारतीय खेळाडू प्रथमच देशाबाहेर लीगमध्ये सामने खेळताना पहायला मिळू शकतात. त्यांना २०२०मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या १०० चेंडूच्या सामन्यात पाहता येऊ शकते.

बीसीसीआयने आयपीएलसाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत भारतीय खेळाडूंना देशाबाहेरील कोणतीही टी-20 लीग खेळण्यास मनाई केली होती. आयपीएल ही एकमेव अशी स्पर्धा आहे जी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून विराट कोहली आणि एमएस धोनी सारखे दिग्गज खेळाडू खेळत आहेत.

आजपर्यंत जगात अनेक लीग सुरु झाल्या आहेत परंतु भारतीय खेळाडू कोणत्याही लीगमध्ये खेळले नाहीत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या 100 चेंडूच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू मात्र भाग घेऊ शकतात. ही स्पर्धा 2020 मध्ये होणार आहे.

आयपीएलची प्रसिद्धी कायम रहावी तसेच आयपीएलच्या स्पर्धेवर परिणाम होऊ नये म्हणून भारतीय खेळाडूंना  देशाबाहेरील टी-20 लीग खेळण्यास मनाई केली होती. . परंतु इंग्लंडमध्ये होणारी लीग ही १०० चेंडूची असल्यामुळे त्याचा आयपीएलवर कोणताही परीणाम होणार नाही. त्यामुळे बीसीसीआय या लीगमध्ये खेळण्यास परवानगी देणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमधील ४ खऱ्या आॅलराउंडरची नावे वाचून तुम्हाला धक्काच बसेल

टाॅप ५- एकही शतक न करता या दिग्गजांनी केल्या आयपीएलमध्ये ४ हजार धावा

शिखर धवनने हा विक्रम करत धोनीला टाकले मागे

अखेर विराट कोहली म्हणाला सॉरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment