---Advertisement---

विराट कोहलीसह या दिग्गजांनी अशा दिल्या एमएस धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

On: रविवार, जुलै 7, 2019 10:08 PM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आज 38 वा वाढदिवस आहे. त्याने त्याचा हा वाढदिवस कुटुंबाबरोबरच भारतीय संघाबरोबरही साजरा केला आहे. धोनीला आज दिवसभरात चाहत्यांकडून तसेच विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरुन भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

धोनीला शुभेच्छा देताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे की ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माही भाई. खूप कमी लोक आहेत, जे विश्वास आणि आदर याचा अर्थ समजतात आणि मला आनंद आहे मागील अनेक वर्षांपासून माझी तूझ्याशी मैत्री आहे. तू आमच्या सर्वांसाठी मोठा भाऊ आहे आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे तू नेहमी माझा कर्णधार असशील.’

तसेच रोहित शर्माने मजेशीर पोस्ट करत धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहितने म्हटले आहे की ‘अरे भाई केक कुठे आहे? वाढदिवसाच्या शुभेच्छा एमएस धोनी.’

याबरोबर धोनीला रिषभ पंतने मार्गदर्शक, मित्र आणि भाऊ असे संबोधत शुभेच्छा दिल्या आहेत. तर हार्दिक पंड्याने तूझ्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण काहीतरी शिकण्याची संधी आहे, असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

याव्यतिरिक्त भारतीय संघातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

धोनीने त्याचा वाढदिवस भारतीय संघाबरोबरच त्याच्या मित्रमैत्रींबरोबर साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.

धोनीला अनेक दिग्गजांनी दिलेल्या शुभेच्छा –

https://twitter.com/ICC/status/1147731974917951488

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडियाने असा साजरा केला एमएस धोनीचा वाढदिवस, पहा व्हि़डिओ

गांगुली, सचिन नंतर किंग कोहली असा विक्रम करणारा केवळ तिसरा भारतीय

विश्वचषकात ११ वर्षांनंतर कोहली समोर पुन्हा विलियम्सनच्या न्यूझीलंडचे आव्हान; होणार खास योगायोग

…आणि अखेर धोनीचे गेल्या वाढदिवसाला अपुर्ण असलेले स्वप्न पुर्ण झाले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment