भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 5 सप्टेंबरला दुपारी 1:30 वाजता विश्वचषक 2023 साठी संघाची घोषणा करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये काही युवा खेळाडूंनाही संधी मिळू शकते. विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचे संघातील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्यासोबतच सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांनाही संधी दिली जाऊ शकते.
आशिया चषक 2023 मध्ये सहभागी झाल्यामळे भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आपले सामने खेळत आहे. या स्पर्धेत भआरतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळला. यामध्ये भारताची वरच्या फळीतील फलंदाजी खराब झाली. विश्वचषकापूर्वी मोठ्या सामन्यात भारतीय दिग्गज खेळाडूंचे फ्लॉप होणे ही चिंतेची बाब आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी पाकिस्तानविरुद्ध स्टॅक केले होते. यावेळी विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
माध्यमातील वृत्तांनुसार विश्वचषकाच्या संघात केएल राहुल आणि ईशान किशन यांचा समावेश करण्यात आला आहे. ईशीनने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध जवरदस्त कामगिरी केली. हार्दिक पंड्याही संघाचा एक भाग आहे. पंड्याने पाकिस्तानविरुद्धही महत्त्वाची खेळी खेळली. भारतीय संघ शुभमन गिलच्या सलामवीरीवर विचार करत आहे. त्याची जागा जवळपास निश्चित झाली आहे.
रिपोर्टनुसार संजू सॅमसनला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. आशिया चषकासाठी भारतीय संघामध्ये राखीव खेळाडू म्हणूनही त्याचा समावेश करण्यात आला होता. सॅमसनसोबतच तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णाकडेही दुर्लक्ष करण्यात येईल. तिलक हा गुणवान खेळाडू आहेत. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा फारसा अनुभव नाही. यामुळे या गोष्टीचा विचार केला जावू शकतो.
विश्वचषक 2023 साठी भारताचा संभाव्य संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज (indian cricket team annoucment for world cup 2023 update)
महत्वाच्या बातम्या-
कुठे आणि कसा पाहायचा श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामना?, जाणून घ्या लगेच
विश्वचषक संघातून शार्दुल अन् अय्यरची हाकालपट्टी, पाहा माजी दिग्गजाने कोणत्या 15 खेळाडूंची केलीये निवड