रविवारी (७ नोव्हेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अफगानिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून जोरदार विजय मिळवला. या विजयासह त्यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या सामन्यानंतर भारत आणि अफगानिस्तान संघाचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न देखील तुटले आहे. भारतीय संघ स्पर्धेच्या बाहेर झाला असून, भारतीय संघाचा शेवटचा सामना नामिबिया संघासोबत होणार आहे.
सराव सत्र केले रद्द
अफगानिस्तानच्या पराभवामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू भलतेच निराश झाले आहेत. भारतीय संघाला जर या स्पर्धेत टिकून राहायचे होते. तर एकमेव अफगानिस्तान संघाचा सहारा होता. परंतु अफगानिस्तान संघाला या सामन्यात साजेशी कामगिरी करता आली नाही. बलाढ्य न्यूझीलंड संघासमोर अफगानिस्तान संघाला अवघ्या १२४ धावा करण्यात यश आले होते. हे आव्हान न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून पूर्ण केले आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. यानंतर भारतीय संघाने नामिबिया संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वीचे सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला १० गडी राखून विजय मिळवला. तर न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर भारतीय संघाने अफगानिस्तान आणि स्कॉटलॅंड संघाला पराभूत करत जोरदार विजय मिळवला. परंतु भारतीय संघाला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अफगानिस्तान संघाने विजय मिळवणे आवश्यक होते. परंतु अफगानिस्तान संघाला या सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आले.
न्यूझीलंड संघाचा जोरदार विजय
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, अफगानिस्तान संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगानिस्तान संघाकडून प्रथम फलंदाजी करताना नाजिबुल्लाह जदरानने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तर गुलबदिन नईबने १५ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर अफगानिस्तान संघाला २० षटक अखेर ८ बाद १२४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, न्यूझीलंड संघाकडून केन विलियमसनने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनवेने नाबाद ३६ धावांची खेळी करत न्यूझीलंड संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्ध ९४ धावा चोपणाऱ्या दक्षिण आफ्रिकी फलंदाजाची कार्तिकला पडली भुरळ, उधळली स्तुतीसुमने
अरेरे, काय वेळ आली! भारत टी२० विश्वचषकातून बाहेर, माजी भारतीय शिलेदारानेच उडवली संघाची खिल्ली