आगामी टी२० विश्वचषक अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. १७ ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघातील खेळाडू एका नव्या रुपात दिसतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेसाठी नवीकोरी जर्सी बनवली आहे, ज्याचे अनावरण बुधवार रोजी (१३ ऑक्टोबर) करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे लवकरच अनावरण केले जाईल, असे सांगितले होते. भारतीय संघाची टी२० विश्वचषकासाठी बनवण्यात आलेली जर्सी जुन्या जर्सीपेक्षा थोडी वेगळी आहे. भारतीय संघाची जुनी जर्सी गडद निळ्या रंगाची होती. या नव्या जर्सीचा रंगही अगदी तोच आहे, परंतु त्यावरील डिझाईन वेगळी आहे. या जर्सीवर हलक्या निळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत. तसेच एका बाजूला बीसीसीआयचा लोगोही आहे.
बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नव्या जर्सीचे फोटो शेअर केले आहेत. बीसीसीआयची किट स्पॉन्सर एमपीएल स्पोर्ट्सनेही त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर नव्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे. जो फोटो बीसीसीआयने शेअर केला आहे, त्यामध्ये कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल नवी जर्सी घातलेले दिसत आहेत.
Presenting the Billion Cheers Jersey!
The patterns on the jersey are inspired by the billion cheers of the fans.
Get ready to #ShowYourGame @mpl_sport.
Buy your jersey now on https://t.co/u3GYA2wIg1#MPLSports #BillionCheersJersey pic.twitter.com/XWbZhgjBd2
— BCCI (@BCCI) October 13, 2021
भारताची टी२० विश्वचषकाची पहिली लढत पाकिस्तानविरोधात
यंदा टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाला ब गटात ठेवण्यात आले आहे. त्यांचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी दुबई येथे हा सामना रंगेल. त्यानंतर याच मैदानावर ३१ ऑक्टोबर रोजी भारत न्यूझीलंडविरुद्ध त्यांचा दुसरा सामना खेळेल. तर ३ नोव्हेंबर रोजी अबु धाबीत अफगाणिस्तान आणि पुढे ५ नोव्हेंबर व ८ नोव्हेंबरला पात्रता फेरीतून आलेल्या संघांसोबत त्यांची भिडंत होईल. हे सामने दुबईत होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिकच्या फिटनेसबाबत अजूनही शंका, टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआयची ‘या’ धाकड अष्टपैलूवर नजर
‘मला तुझा अभिमानच आहे’, कर्णधार म्हणून अंतिम सामन्यातही फेल झालेल्या कोहलीचे बहिणीने वाढवलं मनोबल
‘या’ क्रिकेटरची बड्डेदिनी स्वत:लाच ग्रेटभेट, शतक ठोकत मोडला मितालीचा २२ वर्षे जुना विक्रम