भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ गुरुवारी (23 फेब्रुवारी) आमने सामने आले. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (ICC Womens T20 World Cup) 2023चा हा उपांत्य सामना होता. या सामन्यात भारतीय संघाला 5 धावांनी नजीकचा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय महिला संघाला असे आयसीसीच्या बाद फेरीतील पराभव सातत्याने पहावे लागत आहेत. त्यामुळे संघाला चोकर्सचा शिक्का लागताना दिसतोय.
या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर 173 धावांचे आव्हान ठेवले होते. एक वेळ भारतीय संघ सामन्यात आघाडीवर असताना फलंदाजांनी केलेला हाराकिरी मुळे भारताला केवळ पाच धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला प्रवेश करता आला नाही.
भारतीय संघाने सर्वात प्रथम 2005 वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यावेळी भारताला एकतर्फी हार पत्करावी लागली. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी 2017 मध्ये भारतीय संघाने वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने आपले अखेरचे 7 बळी केवळ 28 धावांवर गमावल्याने संघाला 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलियाने 2018 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत व 2020 टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताला पराभूत करत पुन्हा एकदा विश्वविजेता होण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. 2022 मध्ये वनडे विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत जागा बनवण्यात अपयश आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना हातात असताना मोक्याच्या क्षणी नो बॉल टाकला गेल्याने भारतीय संघ पराभूत झाला. त्यामुळे सरस धावगतीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत जागा बनवली. तसेच, 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियात भारतीय संघासमोर उभा असताना भारतीय संघाला त्यांना पराभूत करणे जमले नाही.
आयसीसी स्पर्धांमध्ये बाद फेरीत जाऊन भारताचा वरिष्ठ महिला संघच सातत्याने अशा प्रकारे कच खात असल्याने, संघाला जोकर्स म्हणून देखील संबोधले जाऊ लागले आहे.
(Indian Cricket Team Not Win ICC Trophy Due To Silly Mistakes And Tagged Chokers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कारकिर्दीतील 9व्या इनिंगमध्ये हॅरी ब्रुकचा विश्वविक्रम, भारतीय दिग्गजाचा मागे टाकत केल्या सर्वाधिक धावा
ते परत येतायेत! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंची लीजेंड्स लीग ‘या’ तारखेपासून होतेय सुरू